शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर जिल्हा १३ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:46 AM

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत आॅनलाईन मते जाणून घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून सर्वाधिक जनजागृती असलेल्या जिल्ह्याला, राज्याला पुरस्कृत करण्यात येणार होते. त्यासाठी जास्तीत जास्त मत नोंदविणे अपेक्षित होते. परंतु राज्याच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अहवालात नागपूर जिल्ह्यात १५०९६ मते नोंदविण्यात आली. त्यामुळे नागपूर जिल्हा सर्वेक्षणात १३ व्या स्थानावर आला.

ठळक मुद्देउद्दिष्टाचा टप्पा गाठला : १५ हजारावर नागरिकांनी नोंदविली आॅनलाईन मते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत आॅनलाईन मते जाणून घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून सर्वाधिक जनजागृती असलेल्या जिल्ह्याला, राज्याला पुरस्कृत करण्यात येणार होते. त्यासाठी जास्तीत जास्त मत नोंदविणे अपेक्षित होते. परंतु राज्याच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अहवालात नागपूर जिल्ह्यात १५०९६ मते नोंदविण्यात आली. त्यामुळे नागपूर जिल्हा सर्वेक्षणात १३ व्या स्थानावर आला. मात्र या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट लोकसंख्येच्या ५ टक्के होते. त्यामुळे जिल्ह्याने नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे समाधान विभागाने व्यक्त केले.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने १ ते ३१ आॅगस्ट दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी ‘एसएसजी १८’ अ‍ॅप तयार करण्यात आले होते. हे अ‍ॅप अ‍ॅण्डरॉईड मोबाईलवर डाऊनलोड करून, त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यायची होती. एका व्यक्तीला एकदाच मत नोंदविता येणार होते. या सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. तरीसुद्धा नागपूरचा क्रमांक इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगलाच माघारला. राज्यात सर्वाधिक २,२१,३२१ मतदान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल सोलापूरचा क्रमांक लागतो. सोलापुरात १,७४,७३० लोकांनी मतदान केले. सर्वेक्षणातून आलेल्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांचे व राज्याचे स्वच्छतेच्या बाबतीत स्थान आणि क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यांना आणि राज्यांना २ आॅक्टोबरला सन्मानित करण्यात येणार आहे. परंतु मतदानाच्या अत्यल्प नोंदणीमुळे नागपूर जिल्हा या पुरस्कारातून बाद झाला आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहे.राज्यातील काही जिल्ह्यांचे मतदाननाशिक २२१३२१सोलापूर १७४७३०सातारा १२८७०३कोल्हापूर १०९५२०अहमदनगर ९४८५३सांगली ८९४०९पुणे ५३२२४रायगड ४९६७४बुलडाणा ४६५७९चंद्रपूर ४१५८७सिंधदूर्ग २९२५८उस्मानाबाद २७१११गोंदिया २४५६६नांदेड २४२७५अमरावती २४१९५जळगाव २२४९१बीड २०७४८वर्धा १७३९२नागपूर १५०९६

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर