लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी आणि उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधनात्मक कल्पना सुचविणारे आणि त्या प्रत्यक्षात कृतीत उतरविणारे नेते म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी. अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनातील कार्यशाळेचे उद्घाटन करताना शनिवारी त्यांनी मानवी (युरिन) मूत्रापासून (युरिया) द्रवरूपी खत तयार करण्याची आगळीवेगळी कल्पना सुचविली. ही केवळ कल्पना नसून स्वीडनच्या एका शास्त्रज्ञाने त्यावर संशोधन केले असून, ते प्रत्यक्षात उतरविण्याची तयारीही त्यांनी यावेळी दर्शविली. यासाठी प्रत्येक तालुक्यात युरिन बँक तयार करण्याचे आवाहन करीत यापासून नागरिकांनाही पैसा मिळेल, असे स्पष्ट केले.रेशीमबाग मैदान येथे सुरू असलेल्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनातील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भदोईचे (उत्तर प्रदेश) खासदार वीरेंद्र सिंग, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक गिरीश गांधी, सचिव रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, शेतकºयांनी उत्पादन खर्च व रासायनिक खताचा वापर कमी केल्यास शेतीची उत्पादकता ही अडीचपटीने वाढेल, यासाठी सेंद्रीय शेतीचा अवलंब करून शेतकºयांनी पीक उत्पादकता वाढवावी. ‘एनपीके’खतांमध्ये सेंद्रीय फॉस्फरस व पोटॅश निर्मिती करणे शक्य आहे, पण सेंद्रीय नायट्रोजना(नत्र)करिता असे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते. परंतु आता सेंद्रीय नायट्रोजन निर्मिती मानवी युरिनपासून (मूत्रापासून) करणे शक्य झाले आहे.याकरिता प्रत्येक तालुक्यात ‘युरिन बँक’ स्थापन करण्यात आली पाहिजे, त्याचे कॉन्स्ट्रेशन करून ‘डिस्टिलेशन’ द्वारे त्यातील सेंद्रीय नायट्रोजन वेगळा करता येतो. अशाप्रकारे ठिबक सिंचनाद्वारे द्रवरूपातील विरघळणारा सेंद्रीय नायट्रोजन पिकांना मिळू शकते, यामुळे रासायनिक युरिया खताचा वापर करण्याची गरज भासणार नाही व ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च वाचेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. खतांच्या निर्मितीसाठी मानवी केस, मूत्र यांचा योग्यरीतीने वापर केल्यास अल्पदरामध्ये खतनिर्मिती होऊ शकते. यासाठी उद्योजकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नितीन गडकरी म्हणाले, शेतकºयांनी शेती करताना शेतीपूरक व्यवसायावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात हेटीकुंडी या गावात गौळाऊ गार्इंपासून मिळणारे गोमूत्र मधुमेहावर अत्यंत गुणकारी सिद्ध झाले आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी जैविक शेतीकडे वळावे. जैविक शेतीमुळे जमिनीचा कसदेखील कायम राहतो.
‘वन ड्रॉप मोअर क्रॉप’ हे धोरण अंगिकाराशेतकºयांनी कॅनलद्वारे पाणी उपसा सिंचन करण्यापेक्षा पाईपद्वारे ड्रिप किंवा स्प्रिंकलरच्या साह्याने पिकांना पाणी द्यावे. ड्रिपच्या साह्याने पाणी दिल्यामुळे जमिनीत पाणी खोलवर मुरून ओलावा कायम राहतो. यासाठी ‘वन ड्रॉप मोअर क्रॉप’ हे धोरण अंगिकारावे. यामुळे पिकांचे उत्पादन २.५ टक्क्याने वाढेल. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. मायी यांनी केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले.देशाच्या विकासाचा मार्ग कृषी क्षेत्रातूनच : वीरेंद्र सिंगखासदार वीरेंद्र सिंग यावेळी म्हणाले, भारताच्या विकासाचा मार्ग कृषी क्षेत्रातून जातो. कृषी क्षेत्र आहे म्हणूनच ही सृष्टी जिवंत आहे. ही भारतीय प्राचीन परंपरा असून या परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळेच अर्थसंकल्पात केंद्र शासनाने ४२ टक्के निधीची तरतूद ही ग्रामीण व कृषी विकासासाठी केली असल्याचे सांगितले.