शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

सखी संक्रांती मेळाव्यात परंपरेचा गोडवा

By admin | Published: February 02, 2016 2:51 AM

जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने आयोजित संक्रांत मेळावा परंपरेच्या गोडव्याने रंगला.

कलर्स व लोकमत सखी मंचचा उपक्रम नागपूर : जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने आयोजित संक्रांत मेळावा परंपरेच्या गोडव्याने रंगला. हळद-कुंकू, तीळगूळ, वाण, हलव्याचे दागिने, विविध स्पर्धा, स्टॉल्स आणि मनोरंजनामुळे हा मेळावा स्नेहगुणाचा ठरला. सखींचा ‘फॅशन शो’मधून पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम रसिकांनी अनुभवला. निमित्त होते कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत सखी संक्रांत मेळाव्याचे. सुभाष मार्गावरील गीता मंदिरात आयोजित या मेळाव्याला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.‘कलर्स चॅनल’ला महिलांची पहिली पसंती मिळत आहे. या चॅनलच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी आपल्या परंपरा, संस्कृती जोपासण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. एकदा पुन्हा नवीन विषय आणि नवीन कलावंतांसोबत ‘कलर्स’वर नवी मालिका ‘कृष्णदासी’ रसिकांच्या सेवेत प्रसारित होत आहे. देवदासी प्रथेवर आधारित या मालिकेत कुमुदिनी तुलसी आणि आराध्या नामक स्त्री अभिनेत्री अधिकार आणि समानतेसाठी संघर्ष करताना दिसून येणार आहे. ही मालिका रात्री १०.३० वाजता ‘कलर्स चॅनल’वर सुरू आहे. बऱ्याच कालावधीपासून चालू असलेली देवदासी ही प्रथा आजच्या पिढीच्या नजरेतून मार्मिक रूपात सादर करण्याचा प्रयत्न ‘कलर्स चॅनल’ने केला आहे. कलर्सच्यावतीने सखींसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात भजन स्पर्धेतील विजेत्यांना कलर्सच्यावतीने चांदीच्या कुंकवाची डबी भेटवस्तूच्या रूपात देण्यात आली. यावेळी डागा ले-आऊटच्या भक्तिरस भजन मंडळाने ‘कृष्णजीची भक्ती’ हे भजन सादर केले. संक्रांत मेळाव्याप्रसंगी पारंपरिक उखाणे स्पर्धा रंगली. ‘होम मिनिस्टर’सखींमधील प्रश्नोत्तरी स्पर्धेत विजेत्या सखीला पुरस्काराच्या स्वरूपात पैठणी देण्यात आली. या मेळाव्याचे वैशिष्ट्य सखींचे ‘फॅशन शो’ ठरले. यात सहभागी सखी काळ्या साडीमध्ये हलव्याचे दागिने घालून रॅम्पवर उतरल्या होत्या. सभागृहाच्या बाहेर विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. कार्यक्रमात सहभागी सखींना हळद-कुंकू, तीळगूळ आणि वाण देण्यात आले. निकालस अलंकारच्यावतीने चांदीचे पाणी चढविलेले लक्ष्मीचे नाणे सखींना वाणाच्या रूपात देण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना निशा हर्बलच्यावतीने ‘गिफ्ट हॅम्पर’ देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निशा हर्बलचे सुनील खोटेले व श्रीकांत तुंगार, मुलतानी प्रोडक्शनचे रूपेश भोरकर, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या अर्यना भारती आणि शीतल महाजन उपस्थित होते. परीक्षक म्हणून वैशाली देशपांडे, ललिता गुलईकर होत्या. संचालन नेहा जोशी यांनी केले.(प्रतिनिधी)कॅन्सर व त्वचा रोगावर मार्गदर्शनकॅन्सर रोग विशेषज्ञ डॉ. सौरभ प्रसाद यांनी कॅन्सरचे वाढते धोके, कॅन्सरची लक्षणे, त्याचे विविध प्रकार, उपचाराची प्रक्रिया आणि विशेष देखभाल यावर मार्गदर्शन केले. डॉ. अंशुल जैन यांनी प्रदूषणामुळे वाढत असलेल्या त्वचा रोगाची माहिती दिली. यावेळी त्यांनी आढळून येणाऱ्या नव्या त्वचा रोगांवरही मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेतेउखाणे स्पर्धा : प्रथम- संगीता पिसाड, द्वितीय- दिव्या राघोर्ते, तृतीय ऋद्धी ठाकूरफॅशन शो : प्रथम- पायल धापोडकर, द्वितीय- शुभांगी लांजेवार, तृतीय ज्योत्स्ना नगरारेव्यंजन स्पर्धा : प्रथम माधुरी राऊत, द्वितीय-हर्षाली काईलकर, तृतीय- प्रियंका राठीहोम मिनिस्टर स्पर्धा : पैठणी विजेता माया सावरकर आणि शीला शेटे. कृष्ण भजन स्पर्धा : रोशनी शेगावकर, चित्रा कांबळे, शांता हुडिया, पूजा सालीगंजेवाल, नंदा गुप्ता, आशा खत्री, निकुंज भटनागर, राधा चौरसिया, शोभा निमजे, सृष्टी नागपुरे.