नागपूर : बुधवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूची दहशत कमी होण्याऐवजी आणखी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या तीन महिन्यात नागपूर विभागात ८१ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून या रोगाने आतापर्यंत १९ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात १३ महिला असून पाच बालकांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिस्थिती नाजूक बनत चालली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांचे दावे केले जात असले तरी स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या स्वाईन फ्लू रुग्णाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ८१ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सहा पुरुष असून १३ महिलांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४५ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. यातील २९ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर सात रुग्ण अजूनही इस्पितळांमध्ये उपचार घेत आहे. स्वाईन फ्लू निष्पन्न झालेल्या रुग्णांमधून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार बालकांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूची ही आहेत लक्षणे ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत.
चिमुकल्यांना स्वाईन फ्लूचा धोका
By admin | Published: May 05, 2017 2:32 AM