कोविडमुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. यावेळी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी चाईल्ड लाईनने पुढाकार घेतला व कॅफे संस्थेच्या सौजन्याने गरजू मुलांना टॅब वितरीत केले.
आतापर्यंत ८० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. तसेच पहीली ते पाचवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेशासह अन्य साहित्याची किट उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी श्रध्दानंद अनाथालय, आशा किरण, राहुल बाला सदन, अनुग्रह अनुराधा बालगृह, युवाज्योती या संस्थेतील विद्यार्थ्यांना टॅब वितरीत करण्यात आले.
यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अभिजीत देशमुख, महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे, बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, हेल्पलिंक चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय त्रिवेदी, चाईल्ड लाईनचे संचालक डॉ. केशव वाळके, डॉ. सरोज कोल्हे, फादर हेराल्ड आणि जिल्हा समन्वयक श्रध्दा टल्लू उपस्थित होते.