नागपूर : महान सुफी संत हजरत बाबा सैय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांची छब्बीसवी सोमवारी, ६ मे रोजी ताजाबाद शरिफ येथे साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या वतिने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी सकाळी ९ वाजता ट्रस्टच्या ऑफिसमधून झेंडा घेतला जाईल. त्यानंतर दर्गाह परिसरात परंपरागत परचम कुशाई होईल. बाबांना फुल तसेच चादर पेश करून प्रार्थना केली जाईल. भाविकांना दिवसभर महाप्रसाद (लंगर) वितरित केला जाणार असून रात्री ९ वाजता दर्गाह मध्ये मिलाद शरिफचा कार्यक्रम पार पडेल. सोबतच सुफी कव्वालीचेही आयोजन करण्यात आले आहे. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे चेअरमन प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, विश्वस्त बुर्जिन रांडेलिया, हाजी फारुखभाई बावला, हाजी इमरान खान ताजी, मुस्तफा टोपीवाला, गजेंद्रपाल सिंह लोहिया आणि बाबा ताजुद्दीन दर्गाह खुद्दाम कमेटीचे अध्यक्ष सैयद मोबीन ताजी यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.मंगळवारी अम्मा हुजूरचा संदल निघणारहजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव ताज अहमद राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा ताजुद्दीन दर्गाह मधून मंगळवारी ७ मे रोजी सकाळी ११ वाजता पारंपारिक पद्धतीने अम्मा हुजूर यांच्या वार्षिक उर्सच्या निमित्ताने संदल निघणार आहे. हा संदल ताजाबाद दर्गाह येथून निघून ईतवारी रेल्वे स्थानकावर जाईल. येथून रेल्वेगाडीने भाविक कामठीला जातील. कामठी रेल्वे स्थानकावरून हा संदल कामठी गाडेघाट येथील अम्मा हुजूर यांच्या दर्गाहवर जाणार आहे.
ताजुद्दीन बाबांची छब्बीसवी उद्या, ट्रस्ट तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
By नरेश डोंगरे | Published: May 04, 2024 11:23 PM