शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

थकीत टॅक्स न भरणाऱ्यांवर कारवाई करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:22 AM

मागील अनेक वर्षापासून असलेली मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी भरली जात नाही. परिणामी महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. याचा विचार करता थकीत टॅक्स न भरणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देसंदीप जाधव यांचे निर्देश : कर आकारणी व संकलन समितीची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील अनेक वर्षापासून असलेली मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी भरली जात नाही. परिणामी महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. याचा विचार करता थकीत टॅक्स न भरणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी मंगळवारी दिले.जाधव यांनी आशीनगर व मंगळवारी झोनचा मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, बसपा गटनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कर अधीक्षक फा.गो उके, सहायक कर अधीक्षक गौतम पाटील तर मंगळवारी यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरीक्षक व कर संकलक उपस्थित होते.कर विभागात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असूनही योग्य टॅक्स वसुली न करणाऱ्या निष्क्रिय कर निरीक्षक व कर संकलक यांच्यावर कारवाई केली जाईल. दिवसेंदिवस थकबाकी वाढत आहे. त्यामुळेच देण्यात आलेले त्रैमासिक उद्दिष्ट निम्मेही गाठता आले नाही. टॅक्स वसुलीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यास महापालिका तत्पर आहे. त्यामुळे कर निरीक्षक व संकलकांनीही आपल्या कामाप्रति तत्परता दाखवावी, असे जाधव म्हणाले.कर निरीक्षक व कर संकलक यांनी नागरिकांशी सुसंवाद साधावा. आपल्या कुशल नेतृत्वगुणाचा उपयोग करून घेत ३० सप्टेंबरपर्यंत त्रैमासिक उद्दिष्टपूर्ती होईल, यावर लक्ष केंद्रित करा, कर वसुली करताना जर त्रास होत असेल तर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या, असा सल्ला सुनील अग्रवाल यांनी दिला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर