- शिवाजी नगर येथील नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
वाडी: शिवाजीनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी वाडीत सर्वत्र फॉगीिग मशीनद्वारे फवारणी होत असताना शिवाजीनगर मध्ये अजूनपर्यंत फवारणी करण्यात आली नाही. यावर योग्य ती कारवाई करून शिवाजीनगरमधील नागरिकांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन वाडी न.प.चे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना सोमवारी देण्यात आले.
नगर परिषद वाडी अंतर्गत वाॅर्ड क्रमांक पाचमधील शिवाजीनगरमधील अमरावती रोड ते प्राथमिक उपचार केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला वाहने उभी असतात. त्यांच्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. वाहन चालक रस्त्याच्याकडेला उभे राहून लघुशंका करतात. वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. वाडी परिसरात डासामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या रोगाची भीती निर्माण झाली आहे. यावर न.प.ने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे राजेश जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, श्याम मंडपे, वसंत ईखनकर, दिनेश उईके, अशोक माने, कृष्णराव चरडे, नीळकंठ रासेकर आणि शिवाजीनगर येथील नागरिकांचा समावेश होता.
260721\img_20210726_184839.jpg
फोटो