शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांची लहान मुलांप्रमाणे घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:04 PM

स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया यामधलाच अलझायमर हा महत्त्वाचा प्रकार आहे. ५५ ते ६० वर्षे वयोगटानंतर होणारा हा सामान्य आजार आहे. जर्मन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अलझायमर यांनी या आजारावर १९०६ मध्ये पहिल्यांदा प्रकाश पाडला होता. लहान मुलांना नवीन काहीतरी शिकण्याची उर्मी असते, मात्र अलझायमर झालेल्या वृद्धांच्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी विस्मृतीत गेल्या असतात. अनेकदा घरची माणसे आणि नातेवाईकांचीही ओळख विसरलेली असते. सिनेमा आणि इतर गोष्टींमुळे या आजाराबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. पण आपल्या जवळच्या ज्येष्ठाला हा आजार जडला असेल तर गैरसमजातून त्रास बाळगू नका. या आजारावर उपचार नाही पण या रुग्णांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतल्यास त्याचे परिणाम मात्र कमी केले जाऊ शकतात.

ठळक मुद्देभारतात ४० लक्ष रुग्ण : पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दीडपट धोकाजागतिक अलझायमर दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया यामधलाच अलझायमर हा महत्त्वाचा प्रकार आहे. ५५ ते ६० वर्षे वयोगटानंतर होणारा हा सामान्य आजार आहे. जर्मन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अलझायमर यांनी या आजारावर १९०६ मध्ये पहिल्यांदा प्रकाश पाडला होता. लहान मुलांना नवीन काहीतरी शिकण्याची उर्मी असते, मात्र अलझायमर झालेल्या वृद्धांच्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी विस्मृतीत गेल्या असतात. अनेकदा घरची माणसे आणि नातेवाईकांचीही ओळख विसरलेली असते. सिनेमा आणि इतर गोष्टींमुळे या आजाराबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. पण आपल्या जवळच्या ज्येष्ठाला हा आजार जडला असेल तर गैरसमजातून त्रास बाळगू नका. या आजारावर उपचार नाही पण या रुग्णांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतल्यास त्याचे परिणाम मात्र कमी केले जाऊ शकतात.शहरातील मेंदूतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी या अलझायमरबाबत जागृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. हा आजार अनेक महत्त्वाच्या लोकांना जडला आहे. त्यामुळे वृद्धत्व म्हणून याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण जगात १२ टक्के लोकसंख्या ६० वर्षे वयोगटातील असून भारतातील ४० लक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. ५५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता ०.५ टक्के आहे. मात्र दर पाच वर्षाने हे प्रमाण दुपटीने वाढत जाते. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दीडपट अधिक आहे. जीवनशैलीच्या दोषामुळे हा आजार बळावला असून २०३० पर्यंत रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची भीती आहे.अलझायमरचा दोष असणारे वृद्ध अनेकदा घरच्या मंडळींना किंवा नातेवाईकांना विसरतात. त्यामुळे बाहेरचे कुणी आले तर हे ज्येष्ठ जेवण मिळत नाही किंवा सोय होत नाही, असे सांगतात. त्यावेळी आपल्याला अपमानित झाल्यासारखे वाटते. मात्र तसे वाटून घेऊ नये किंवा भांबावून जाउ नये. आपल्या माणसाला हा आजार आहे, हे समजून घ्यावे. गैरसमज बाळगण्यापेक्षा आजाराबाबत समजून घेणे व संबंधित रुग्णाची काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.लक्षणेआठवण विसरणे, घरचा रस्ता विसरणे, नवीन गोष्टी शिकण्यास अडचण येणे, परत परत तेच प्रश्न विचारणे, दिवसाचे, वेळेचे व जागेचे भान नसणे, रोजच्या लोकांचीही ओळख न पटणे, काम करण्यास व कपडे घालण्यास अडचण, व्यक्तिमत्त्वात बदल होण्यासह हेकेखोरपणा, हट्टीपणा, त्रासदायकपणा, चिडचिड होणे, वैचारिक बदल तसेच भाषेचा व विचारांचा अंदाज न येणे, आदी लक्षणे आढळून येतात.कारणे

  •  मेंदूचे न्यूरान किंवा माहिती पोहचविणाऱ्या पेशी कमी होतात व मेंदू आकुंचन पावतो.
  •  व्हॅस्कूलर डिमेन्शियामध्ये रक्तवाहिन्या बंद होतात.
  •  जीवनशैलीचे दोष, व्यायामाचा अभाव, वाचन कमी
  •  तरुणांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा अलझायमरची शक्यता नाही. अनेकदा कामाचे टेन्शन, उदासीनता किंवा कामात एकाग्र नसल्यास विसरण्याची शक्यता असते. काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही विसराळूपणा येऊ शकतो. किंवा थायराईड, हायपोथायराईड असलेल्या रुग्णांना विसरण्याची शक्यता असते. मात्र हा प्रकार बरा होण्यासारखा आहे. त्यामुळे ५० वयोगटापूर्वी एखाद्याची सहज आठवण विसरत असेल तर तो अलझायमर असल्याचा गैरसमज बाळगू नये.

निदानरुग्णाच्या लक्षणावरून रक्ततपासणी करून, सिटी स्कॅन, एमआरआय करून कोणत्या प्रकारचा आहे हे समजते. हा आजार बरा होण्यासाठी औषधोपचार नाही. मात्र आजार वाढण्याची गती कमी करण्यासाठी औषध आहेत. त्यामुळे धोका कमी होऊ शकतो व रुग्णाला वाचविले जाऊ शकते.होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजीशारीरिक आणि बौद्धिक व्यायाम आवश्यक. नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा बाळगावी, कुतूहल व उत्सुकता बाळगावी. नवीन भाषा, एखादी कला असे जीवनभर काहीतरी शिकण्याचा उत्साह बाळगा. पुस्तके वाचा, कोडे सोडवा, गार्डनिंग, खेळ, सायकलिंग करा. डायबिटीज किंवा इतर आजार असल्यास योग्य औषधोपचार करा. व्यसनांपासून दूर रहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना भेटा व सामाजिक कार्यात सहभागी व्हा.नातेवाईकांनी घ्यावयाची काळजीअल्झायमर झालेला ज्येष्ठ हा लहान मुलासारखा असतो. त्यामुळे त्याची मुलाप्रमाणे काळजी घ्या. नात्यामध्ये संभ्रम केल्यास भांबावून जाऊ नका. रुग्णाला जागेचे भान राहत नसल्याने किचन, बाथरूममध्ये बोर्ड लावा. बाहेर जाताना सोबत जा किंवा शक्य नसल्यास त्यांच्या खिशामध्ये त्यांचे नाव, घरचा पत्ता, मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी ठेवा. सिनेमामध्ये दाखविल्याप्रमाणे चुकीच्या संकल्पना बाळगू नका. काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य