लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील वर्दळीच्या मार्गावर माेकाट गुरांचा मुक्तसंचार व ठिय्या असताे. या गुरांमुळे रहदारीस अडसर निर्माण हाेत असून, अपघातही हाेत आहे. त्यामुळे या माेकाट जनावरांचा कायमचा बंदाेबस्त करून ही समस्या साेडवावी, अशी मागणी शिवसेनेच्या रामटेक शहरातील पदाधिकाऱ्यांनी केली असून, त्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
शहरातील गवळण नाला ते बसस्थानक चाैक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक, लंबे मारोती मंदिर परिसरात माेकाट जनावरांचा सर्वाधिक वावर आहे. याच वर्दळीच्या भागात गुरांचे कळप सतत फिरत असतात. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी शेण पडले असल्याचे दिसून येते. ही जनावरे हाकलून किंवा वाहनांच्या आवाज व हाॅर्नमुळे बाजूला हाेत नसल्याने अपघातही हाेतात. रामटेक हे तीर्थ व पर्यटनस्थळ असल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही माेठी आहे. या माेकाट गुरांचा स्थानिकांसाेबतच पर्यटक व भाविकांनाही त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या जनावरांचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे शहर प्रमुख धर्मेश भागलकर, उपशहर प्रमुख पुरुषाेत्तम मेश्राम, विश्वास पाटील, पालिकेचे माजी उपाध्यक्ष सुनील देवगडे, धीरज राऊत, राहुल ठाकूर, माणिक ताकोत, बादल कुंभलकर, राधेश्याम साखरे, दीपक निरुडवार, विशाल पारधी, दिनेश माकडे, सुंदर जत्रे, राहुल शर्मा, मनोज गोतमारे यांचा समावेश हाेता.
...
मालकांवर कारवाई करा
या माेकाट गुरांमुळे शहरातील एचडीएफसी बॅंकेजवळ काही दिवसापूर्वी अपघात झाला. त्यात दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला हाेता. माेकाट फिरणाऱ्या या गुरांचे मालक शहरातच राहतात. पालिका प्रशासनाने मालकांना नाेटीस बजावून त्यांच्या गुरांचा बंदाेबस्त करण्याची सूचना करावी. त्यांनी या सूचनांचे पालन करून पालिका प्रशासनाने ही माेकाट जनावरे पकडून काेंडवाड्यात टाकावी किंवा जाहीररीत्या लिलाव करून विकावी अथवा त्यांच्यावर माेठी दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचनाही काहींनी केली आहे.