लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफत अहमद, नगरसेवक मोहम्मद अक्रम अब्दुल अजिज व मोहिसीनूर रेहमान साफिया कैसर यांच्या अपात्रतेसंदर्भातील निवेदनावर तातडीने निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.याविषयी माजी नगरसेवक सुलेमान अब्बास चिराग अली हैदारी यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मोहम्मद शाहजहा, मोहम्मद अक्रम व मोहिसीनूर यांनी सात वर्षापूर्वी रद्द झालेल्या कंत्राटाला मान्यता दिली. त्यामुळे नगर परिषदेचे ५ लाख ५५ हजार ३३४ रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक वसाहती कायद्यातील कलम ४२ व ५५-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यात यावे असे निवेदन याचिकाकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.
कामठी नगराध्यक्षांच्या अपात्रतेवर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 7:54 PM
कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफत अहमद, नगरसेवक मोहम्मद अक्रम अब्दुल अजिज व मोहिसीनूर रेहमान साफिया कैसर यांच्या अपात्रतेसंदर्भातील निवेदनावर तातडीने निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
ठळक मुद्देआर्थिक गैरव्यवहाराचा आरोप