शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नागपुरातील हातमजुराच्या मुलीची ‘घे भरारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 3:20 PM

घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांच्या हातमजुरीवर कुटुंबाचे दोन वेळचे भरणारे पोट. ना अभ्यासाला आवश्यक पुस्तके, ना सरावासाठी योग्य साहित्य. फक्त मनात अभ्यास करण्याची ओढ होती अन् स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला संकल्प. याच बळावर तिने गरिबीच्या अडथळ्यांवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश अक्षरश: खेचून आणले. मनात जिद्द असली अन् अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली तर अशक्यप्राय वाटणारे व अडथळ्यांनी भरलेले शिखरदेखील सहजपणे सर करता येते हेच तिने दाखवून दिले. असंख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही कहाणी आहे दहावीच्या परीक्षेच ९४ टक्के गुण पटकाविणाऱ्या श्रुतिका जगदीश कोपरकर हिची.

ठळक मुद्देश्रुतिकाला मिळाले ९४ टक्के : हलाखीच्या परिस्थितीत केला संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांच्या हातमजुरीवर कुटुंबाचे दोन वेळचे भरणारे पोट. ना अभ्यासाला आवश्यक पुस्तके, ना सरावासाठी योग्य साहित्य. फक्त मनात अभ्यास करण्याची ओढ होती अन् स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला संकल्प. याच बळावर तिने गरिबीच्या अडथळ्यांवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश अक्षरश: खेचून आणले. मनात जिद्द असली अन् अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली तर अशक्यप्राय वाटणारे व अडथळ्यांनी भरलेले शिखरदेखील सहजपणे सर करता येते हेच तिने दाखवून दिले. असंख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही कहाणी आहे दहावीच्या परीक्षेच ९४ टक्के गुण पटकाविणाऱ्या श्रुतिका जगदीश कोपरकर हिची.शांतिनगर येथील विनायकराव देशमुख हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या श्रुतिकाने गरिबीच्या संघर्षलाटेवर पोहतच यशाचा किनारा गाठला आहे. दैनंदिन गरजांचा खर्च पेलतानाच तिच्या पालकांच्या नाकीनऊ येतात. घर अतिशय लहान, अभ्यासाला जागा कमी अशा स्थितीतदेखील श्रुतिकाने हार मानली नाही. तिने दहावीता वर्षभर मन लावून अभ्यास केला. श्रुतिकाला डॉक्टर होण्याची इच्छा आहे.शाळेने केले मौलिक सहकार्यशाळेतील हुशार मुलगी अशी श्रुतिकाची अगोदरपासूनच ओळख होती. त्यामुळे शाळेनेदेखील तिच्याकडे विशेष लक्ष दिले. प्राचार्य प्रदीप बिबटे यांनी तर तिचा पूर्ण खर्च उचलण्याचीदेखील तयारी दाखविली. अगदी तिला पौष्टिक अन्न मिळावे यासाठीदेखील पुढाकार घेतला. शाळेतील शिक्षकांच्या पाठबळामुळे श्रुतिकाचादेखील आत्मविश्वास वाढला. संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव जोशी व सचिव अविनाश देशपांडे यांनीदेखील तिचा वेळोवेळी हुरुप वाढविला.शिक्षकांचेदेखील डोळे पाणावलेनिकाल जाहीर होताच शिक्षकांनी तिचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घराकडे धाव घेतली. मात्र कळमना येथील तिच्या घरी पोहोचताच सर्वांना धक्काच बसला. शहरात झालेल्या वादळामुळे तिच्या घराचे छप्परच उडाले होते. श्रुतिकाने सर्वांना शेजारच्यांच्या घरी बसविले व तेथे तिचा कौतुकसोहळा झाला. परिस्थितीचे चटके खातदेखील भविष्यासाठी झटणाºया कोपरकर कुटुंबाची जिद्द पाहून शिक्षकांचेदेखील डोळे पाणावले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर