घ्या, आले ना चांगले दिवस..? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दर्शविला इंधन दरवाढीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:28 PM2019-07-10T21:28:09+5:302019-07-11T01:01:35+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झालेली भाववाढ आणि त्यामुळे नागरिकांमध्ये व्यक्त होणारी खदखद बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलनातून व्यक्त केली. पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाची फुले भेट देऊन विचारले, ‘घ्या, आले ना चांगले दिवस..!’ नागरिकांनीही या आंदोलानाला दाद देत फुले स्वीकारली आणि दरवाढीबद्दल नापसंती व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झालेली भाववाढ आणि त्यामुळे नागरिकांमध्ये व्यक्त होणारी खदखद बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलनातून व्यक्त केली. पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाची फुले भेट देऊन विचारले, ‘घ्या, आले ना चांगले दिवस..!’ नागरिकांनीही या आंदोलानाला दाद देत फुले स्वीकारली आणि दरवाढीबद्दल नापसंती व्यक्त केली.
मध्य नागपूर काँग्रेस कमेटीकडून शहरातील विविध भागांमध्ये विशेषत: पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन दिवसभर करण्यात आले. सीए रोड, अग्रसेन चौकात कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. इंधन दरवाढीचा विरोधात काँग्रेसने वेगळ्या पद्धतीने आंदोलन राबवून सरकारच्या धोरणाचा जाहीरपणे निषेध नोंदविला. ठिकठिकाणी झालेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यककर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अग्रसेन चौक
अग्रसेन चौकातील पेट्रोल पंपसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन ‘अच्छे दिन’ च्या उपरोधिक शुभेच्छा दिल्या. या दरम्यान कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नगरसेवक रमेश पुणेकर, जुल्फीकार अहमद भुट्टो, रमण पैगवार, वसीम खान, नंदा पराते, रवी गुडधे, गोपाल पट्टम, मोतीराम मोहाडीकर, बानाबाकोडे, राजेंद्र कुंभलकर, राजा चिल्लाटे, विजय साखरे उपस्थित होते. भाजपने सत्तेत येताच लोकांच्या हिताच्या विरोधातील धोरण राबविणे सुरू केले आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात सरकाने जनतेच्या भल्याचे एकही काम केले नाही, असा आरोप रमेश पुणेकर यांनी केला. वसीम खान म्हणाले, पेट्रोलचे दर वाढवून सरकारने जनतेला लुटण्याचे काम सुरू केले आहे. दरवाढ अवास्तव असूनही आणि नागरिकांचा याला विरोध असूनही सरकारने ती करून आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविले आहे.
शांतिनगर
शांतिनगर येथील युनिव्हर्सल चौकातील पेट्रोल पंपवरही ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन सरकारच्या धोरणांचा विरोध दर्शविण्यात आला. अभिजित वंजारी, ब्लॉक अध्यक्ष निर्मला बोरकर, अल्पसंख्यक सेलचे शहराध्यक्ष इर्शाद अली यांच्या नेतृत्वात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश्वर ठाकरे, मुकेश पौनीकर, अनिल बारापात्रे, पंकज भरकर, राहुल नारेकर, शुभम खुराना, धनराज कामडे, प्रतीक वाराडे, अनिल खोब्रागडे, रेखा यादव, विनायक देशमुख, देवेंद्र वाडबुंदे गुरुजी, पांडुरंग मूल, मोहित वासवानी, शेख शकील, विश्वनाथ पराते, गुणवंत झाडे आदी उपस्थित होते.
माटे चौक
ब्लॉक अध्यक्ष पंकज निघोट यांच्या नेतृत्वात माटे चौकातील पेट्रोल पंपवर आलेल्या ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन दरवाढीचा विरोध दर्शविण्यात आला. प्रशांत कापसे, अजय नासरे, आकाश तायवाडे, रजत देशमुख, इलमकर गुरुजी, गिरीश पांडे, नरेश बिसेन, पीयूष वाकोडीकर, राहुल जगताप, बबलू कुमरे, शुभम आमधरे, जयंता दियेवार, विनायक इंगोले, विक्की मडावी, अतुल मेश्राम, शंतनू उमरेडकर, चिंटू पारधी, पिंटू भोगे, अभय सोमकुळे, पुरुषोत्तम पारेमोरे, बंटी तुरणकर, डॉ. देशमुख, राजेश जीवतोडे, विश्वनाथ धोटे, रजनीश दुबे आदी उपस्थित होते.
शहर काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेलमधील भाववाढीच्या विरोधात ब्लॉकस्तरावर आंदोलन करण्यात आले. यासोबतच तिवरे येथील धरण फुटण्याच्या आणि पीक कर्ज वितरणाच्या बाबतीत सरकाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
ब्लॉकस्तरावर झालेल्या या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भाजपा-शिवसेनेच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यात आले. ठोस पुरावे सादर करूनही सरकारने भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट दिली. मुंबईतील मालाडमध्ये दीड वर्षांपूर्वी दीड कोटी रुपये खर्चून बांधलेली भिंत कोसळली. यात २७ जणांचा मृत्यू झाला. या बांधकामामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. तिवरे बांध फुटण्याची शक्यता आधीच वर्तविली गेली असतानाही काहीच उपाययोजना केली नाही. पीक कर्जवाटपाचे उद्दिष्टही पूर्ण झाले नाही, असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. या शिष्टमंडळामध्ये विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, प्रा. दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, किशोर गजभिये, राजेंद्र नंदनकर, रमेश पुणेकर, स्नेहा निकोसे, विवेक निकोसे, पंकज लोणारे, रजत देशमुख, जुल्फिकार भुट्टो, अॅड. नंदा पराते, अजय नासरे, वासुदेव ढाके आदी सहभागी होते.