नागपूर : यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश करावा, अशी शिफारस बी. एस. बासवान यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीने केंद्र सरकारला केली आहे.समितीने ९ आॅगस्ट २०१६ रोजी यूपीएससीकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर यूपीएससीने हा अहवाल मार्च-२०१७ मध्ये केंद्र शासनाकडे पाठविला. केंद्र शासनाने समितीची शिफारस मान्य केल्यास २०१८ मधील यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश केला जाईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली. न्यायालयाने ही माहिती लक्षात घेता प्रा. डॉ. बालचंद्र खांडेकर यांची याप्रकरणावरील अवमानना याचिका निकाली काढली. प्रकरणावर न्यायमूर्ती वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. (प्रतिनिधी)पाली प्राचीन भाषापाली ही प्राचीन भाषा असून, त्यातून अनेक भाषांचा विकास झाला आहे. सर्व बुद्धकालीन वाङ्मय पाली भाषेत आहे. भारतीय इतिहास, प्रथा, परंपरा, संस्कृती व तत्त्वज्ञान सांगणारी पाली ही एक श्रीमंत भाषा आहे. बनारस हिंदू विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व अन्य अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पाली भाषा शिकविली जाते. परिणामी यूपीएससी परीक्षेतून पाली वाङ्मयाला वगळणे अन्यायकारक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.अवमानना याचिका का?खांडेकर यांनी सुरुवातीला जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने १२ फेब्रुवारी २०१६ रोजी सहा महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. समितीने आदेशाचे पालन करण्यास विलंब केला. परिणामी खांडेकर यांनी अवमानना याचिका दाखल केली होती.
पाली वाङ्मय यूपीएससीत घ्या
By admin | Published: May 03, 2017 3:41 AM