लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सहा उमेदवार जाहीर केले आहे. ते आघाडी विरोधी वक्तव्ये करीत आहेत. मात्र ते काहीही बोलले तरी त्यांना आम्ही सोबत घेऊ. कारण भाजपा-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊ, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन राज्ये हातातून गेल्यावर घाबरलेल्या सरकारला शेतकऱ्यांची आठवण झाली. एका वर्षात सहा हजार मदत व तीदेखील टप्प्याटप्प्याने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. खरे तर सरकारने महिन्याला सहा हजार रुपये द्यायला पाहिजे, असे पाटील म्हणाले. सरकारने सरसकट कर्जमाफी करायला हवी होती. पण त्याऐवजी वर्षाला सहा हजार देऊ केले. संजय गांधी निराधार योजनेतही यापेक्षा जास्त मानधन मिळते, अशी टीका पाटील यांनी केली.येत्या २५ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अण्णा हजारे यांच्या मागण्या सोडवायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनात विधेयक मांडून त्यावर चर्चा घडवून आणता आली असती. पण मुख्यमंत्र्यांनी असे होऊ दिले नाही, असेदेखील ते म्हणाले.मनसेबाबत कुठलीही चर्चा झालेली नाहीदरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या भेटीवर पाटील यांनी मौन बाळगले. मनसेला आघाडीत घेण्याविषयी कोणतीही चर्चा आजघडीला झालेली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:56 PM
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सहा उमेदवार जाहीर केले आहे. ते आघाडी विरोधी वक्तव्ये करीत आहेत. मात्र ते काहीही बोलले तरी त्यांना आम्ही सोबत घेऊ. कारण भाजपा-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊ, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
ठळक मुद्दे निवडणुकांमुळे सरकारला शेतकरी आठवल्याची टीका