लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करावी. या समितीने शाळांची पाहणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे शाळांना निर्देश द्यावे. यानंतरही शाळा उपाय योजत नसतील मान्यता रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे करण्यात आली.काही दिवसांनी पूर्व हरियाणातील रेयान स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागपुरातील पालकांची चिंता वाढली आहे. याची दखल घेत भाजपाचे आ. सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शिक्षण उपसंचालक पारधी यांची भेट घेतली. यावेळी महामंत्री संदीप जोशी, युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवानी दाणी, संघटन मंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते.स्कूल बसचे चालक व वाहक बदलले जात असतील तर त्याची माहिती पालकांना मोबाईलद्वारे दिली जावी. विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास होऊ लागल्यास, दुर्घटना झाल्यास त्यावर त्वरित उपचार करावे.शाळेच्या प्रवेश द्वारावर तक्रार पेटी लावून त्यावर संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिहिला जावा. यासह विविध उपाय महिनाभरात योजण्याचे निर्देश शाळांना द्यावे, अशी मागणी कोहळे यांनी केली. यावेळी शिक्षण उपसंचालक पारधी यांनी शाळांना या संबंधीचे दिशानिर्देश जारी केले जातील, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात देवेन दस्तुरे, प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, भाजयुमोचे शहर महामंत्री जीतू ठाकूर, राहुल खंगार, बालू रारोकर,कमलेश पांडे, नेहल खानोरकर, अक्षय पाटील, सुनील मानेकर, पारेन्द्र पटले, दीपांशु लिंगायत, आलोक पांडेय, वैभव चौधरी, सचिन सावरकर,हितेश घुई आदींचा समावेश होता.शाळांमध्ये ही करा तपासणीशाळेच्या परिसरात व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत का ?शाळेतील सर्व कर्मचाºयांची पोलीस पडताळणी झाली का ?शाळेतील शौचालय व कॅन्टीन स्वच्छ आहे का ?विद्यार्थिनींसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था आहे का ?स्कूल बसवरील चालक वाहकांची पोलीस पडताळणी झाली आहे का ?
शाळांमध्ये सुरक्षेसाठी कडक पावले उचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:36 AM
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करावी. या समितीने शाळांची पाहणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे शाळांना निर्देश द्यावे.
ठळक मुद्देभाजपाची मागणी : शिक्षण उपसंचालकांना दिले निवेदन