शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पट्टेवाटपाची तीन महिन्यात कार्यवाही करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 9:19 PM

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट्टे वाटपासंदर्भात येणारे सर्व अडथळे शासनाने दूर केले आहेत. खासगी जागा, झुडपी जंगल व रेल्वेच्या जागा वगळता अन्य जागांबाबत येत्या तीन महिन्यात योग्य कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी दिले. महापालिकेच्या धरमपेठ, नेहरूनगर, हनुमान नगर, लक्ष्मीनगर, धंतोली, गांधीबाग झोनमध्ये घेण्यात आलेल्या ‘जनसंवाद’मधील शासन स्तरावरील तक्रारींचा पालकमंत्र्यांनी शनिवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्दे‘जनसंवाद’मधील समस्यांचा पालकमंत्र्यांनी केला पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट्टे वाटपासंदर्भात येणारे सर्व अडथळे शासनाने दूर केले आहेत. खासगी जागा, झुडपी जंगल व रेल्वेच्या जागा वगळता अन्य जागांबाबत येत्या तीन महिन्यात योग्य कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी दिले. महापालिकेच्या धरमपेठ, नेहरूनगर, हनुमान नगर, लक्ष्मीनगर, धंतोली, गांधीबाग झोनमध्ये घेण्यात आलेल्या ‘जनसंवाद’मधील शासन स्तरावरील तक्रारींचा पालकमंत्र्यांनी शनिवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेतली.यावेळी आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आयुक्त अभिजित बांगर, झोन सभापती प्रमोद कौरती, रूपाली ठाकूर, रिता मुळे,विशाखा बांते, वंदना यंगटवार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी यांच्यासह सहाही झोनचे नगरसेवक, सहायक आयुक्त उपस्थित होते.पट्टे वाटपासंदर्भात राज्य शासनाने नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे यासाठी आता अभिन्यासाची गरज नाही. नागरिकांच्या सुविधांसाठी तात्काळ संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून जून २०१९ पर्यंत पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करा. रमणा मारोती परिसरात बस स्टॉप ते ईश्वर नगर येथील प्रस्तावित सिमेंट रोडच्या नालीच्या उतारामुळे पाणी नागरिकांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिले.इंदिरा कॉलनी परिसरात उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण करून नागरिकांना अडथळा निर्माण करण्याच्या तक्रारीवरून या जागेचा ताबा घेऊन मनपाच्या मालकीचे फलक लावून नागरिकांच्या सुविधेसाठी उद्यानाच्या विकास कामाला तात्काळ सुरूवात करण्याचे निर्देश दिले.दीक्षाभूमी पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देण्यासाठी आवश्यक पूर्तता करून प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा, याशिवाय शहरात विविध भागात गतिरोधक लावण्याबाबत रस्ते सुरक्षा समितीकडून मान्यता घेउन तात्काळ मंजुरी देणे व महिनाभराच्या आत सर्व सहायक आयुक्तांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.सक्करदरा तलावाचे प्रदूषण थांबवासक्करदरा तलावाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कचरा, गवत व सांडपाणी सोडण्यात येत असल्याने तलावालगत असलेल्या उद्यानात कार्यक्रमासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करून तलावाचे प्रदूषण होणार नाही. याची खरबदारी घेण्याचे निर्देश दिले. 

 

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका