कामठी : शेतीचे फेरफार करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वरंभा (ता. कामठी) येथे मंगळवारी (दि. ८) सायंकाळी करण्यात आली.
आशिष अरुण गाेगलकर (३४) असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर तलाठ्याचे नाव आहे. ताे वरंभा येथे कार्यरत हाेता. झरप (ता. कामठी) येथील शेतकऱ्यास त्याच्या शेतीचा फेरफार करावयाचा हाेता. त्यासाठी आशिष गाेगलकरने त्याला ५० हजार रुपयाची मागणी केली हाेती. त्या शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची खातरजमा करून मंगळवारी वरंभा येथे सापळा रचला. त्याने ५० हजार रुपये स्वीकारताच त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध माैदा पाेलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी दांडेकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षकद्वय याेगिता चाफले व विनाेद आडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.