लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरातील सिव्हील लाईन्स भागात उभारली जाणार आहे. ९० मीटर उंच व २५ मजल्याच्या ‘इनफिनिटी’इमारतीच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे. मंजुरी सोबतच महापालिकेच्या तिजोरीत शुल्क स्वरुपात १८.९३ कोटी जमा झाले आहे. मेट्रो रेल्वे ट्राजिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट (टीओडी)च्या माध्यमातून इमारतीसाठी अतिरिक्त एफएसआय घेण्यात आला आहे. २०२२ पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.शहरातील प्रसिद्ध कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरने ही इमारत उभारण्याला सुरुवात केली आहे. यात ८ हजार चौरस फूट आकाराचे सात बीएचके फ्लॅट राहतील. नागपूर शहरात यापूर्वी ७० मीटर उंचीची रामबाग येथे टाटा कॅपिटल हाईट्स व ६३ मीटर उंचीची गणेशपेठ भागात गोदरेज आनंदम् उभारण्यात आली आहे. ‘इनफिनिटी’इमारत नागपूरसह मध्यभारतात आजवरची सर्वाधिक उंचीची ठरणार आहे. या लक्झरी हाऊ सिंग योजनेमुळे नागपूर शहराला नवी ओळख मिळणार आहे. या इमारतीत पार्किं गसह क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम यासह सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रबंध निदेशक (एमडी) श्रवण कुकरेजा यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. इमारतील सुरक्षा व्यवस्थेसह सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. नागपूर शहरात पार्किं गची गंभीर समस्या आहे. याचा विचार करता इमारतीत खालील तीन मजले पार्किंग राहणार आहे. त्यानंतर क्लब, स्विमिंग पूल व जिमची सुविधा राहील. इमारतीचे बांधकाम २०२२ सालापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु २०२१ पर्यंतच प्रकल्प पूर्ण होईल. या दृष्टीने बांधकाम सुरू आहे. नागपूर शहरात ५० मजली इमारत उभारण्याचे कंपनीचे स्वप्न असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार ३२ हजार चौरस फू ट जागेत उभारण्यात येणाऱ्या या इमारतीचा बिल्टअप एरिया १.२० लाख चौरस फूट आहे. अमेरिकेचे आर्किटेक्ट रेजा काबुल यांनी या इमारतीचा आराखडा तयार केला असून अॅडव्हान्स तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे.
मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरात उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:13 IST
मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरातील सिव्हील लाईन्स भागात उभारली जाणार आहे. ९० मीटर उंच व २५ मजल्याच्या ‘इनफिनिटी’इमारतीच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे.
मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरात उभारणार
ठळक मुद्दे९० मीटर उंचीची २५ मजली इमारतमनपाची बांधकामाला मंजुरीतिजोरीत १८.९३ कोटींचे शुल्क जमा