शहरालगतच्या भागात जलकुंभ व पाण्याच्या लाइनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तसेच शहरातील काही वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरशिवाय पर्याय नाही. टँकर बंद करण्यासाठी प्रकल्प तातडीने पूर्ण करावा लागेल.
- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते मनपा
...
वर्षभरात टँकरमुक्त
१६ जलकुंभांची कामे पूर्णत्वास आली आहेत. काही निविदांना मंजुरी दिली आहे. उर्वरित निविदांची प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरात जलकुंंभांची कामे पूर्ण करून शहर टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा केला जाईल.
- प्रकाश भोयर, अध्यक्ष स्थायी समिती, मनपा
...
शहराला लागणारे टँकर आणि खर्च
वर्ष टँकर खर्च (कोटींमध्ये)
२०१८ ३६० २४
२०१९ ३६५ २८
२०२० २६० १८
२०२१ २६५ २०
....