भिवापूर: आठवडाभरापासून शहरात कृत्रिम जलसंकट उभे असताना कुणीच का मदतीला धावत नाही. त्या जलमित्रासह लोकप्रतिनिधी कुठे गेलेत असा प्रश्न विचारत ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिला भगिनींची व्यथा मांडली होती. दरम्यान रोहित व स्वप्निल या पारवे बंधूंनी पुढाकार घेत तहानलेल्या ‘त्या’ व्याकुळ वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविण्याचे कार्य सुरू केले आहे. नगर पंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे नक्षी, मोखाळा पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये वारंवार लिकेजेस येत आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून शहरातील अर्ध्याहून अधिक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान रोहित व स्वप्निल पारवे यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला. भर उन्हात महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी टँकर पाठविण्याची तयारी चालविली. एवढेच नव्हे तर लागलीच त्यांनी ही सुविधा दोन टँकरनी सुरूही केली. त्यानंतर नगर पंचायतीनेसुध्दा टंचाईग्रस्त वस्त्यांमध्ये टँकर पाठविण्याचे पाऊल उचलले. यावेळी विवेक ठाकरे, अविनाश चिमूरकर, श्रावण भोगे, हिमांशु अग्रवाल, अनिल निखारे आदी उपस्थित होते.
--
महिला भगिनी भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करत आहे. ही बाब लोकमतद्वारे कळली. लागलीच त्या-त्या प्रभागात आम्ही पाणी टँकर पाठविण्यास सुरुवात केली. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप न करता, जेथे प्रशासन कमी पडेल तेथे आपण पुढे आले पाहिजे. कृत्रिम पाणी टंचाई निकाली निघेपर्यंत टँकर पाठविले जाईल.
स्वप्निल पारवे, सामाजिक कार्यकर्ता, भिवापूर
===Photopath===
190521\img-20210519-wa0115.jpg
===Caption===
धनगर मोहल्ला येथे टँकर मधून पाणी भरतांना महिलाभगिनी