शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरातील ‘डांबर’युक्त रस्ते बनले ‘गिट्टी’मय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 7:17 PM

एकीकडे उपराजधानीतील रस्ते सिमेंटीकरणातून स्मार्ट बनले आहेत. तर दुसरीकडे असलेल्या डांबरी रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे. डांबरीकरण उखडल्यने अनेक रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. ही परिस्थिती जवळपास प्रत्येकच रस्त्याची झाली असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न तरी गांभीर्याने घ्यावा, अशी नागपूरकरांची मागणी आहे.

ठळक मुद्दे सुमार दर्जामुळे नागपूरकरांचे हाल : अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे उपराजधानीतील रस्ते सिमेंटीकरणातून स्मार्ट बनले आहेत. तर दुसरीकडे असलेल्या डांबरी रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे. डांबरीकरण उखडल्यने अनेक रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. ही परिस्थिती जवळपास प्रत्येकच रस्त्याची झाली असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न तरी गांभीर्याने घ्यावा, अशी नागपूरकरांची मागणी आहे.शहरात मागील काही दिवसापासून सलग पावसाची रिमझिम सुरू होती. सोमवारी ती थांबली आणि शहरातील रस्त्यांची विशेषत: डांबरी रस्त्यांची दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली. रस्त्यावरील डांबर पूर्णत: निघालेले आहे. गिट्टी रस्त्यावर सवत्र पसरली आहे. ही परिस्थिती विशिष्ट एका भागात नसून शहरातील जवळपास सर्वत्र दिसून येत आहे. अमरावती रोडवरील महाराजबाग चौकातून व्हेरायटी चौकादरम्यान म्युर मेमोरियल हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावरील डांबर पूर्णत: निघाले असून गिट्टी पसरलेली आहे. तीच परिस्थिती काटोल रोडवर ठिकठिकाणी दिसून येते, गिट्टीखदान चौक पोलीस स्टेशन, पुढे पोलीस मुख्यालयासमोरील रस्ता खराब झालेला आहे. तुकडोजी चौक ते मेडिकल चौक, मेडिकल चौक ते क्रीडा चौक, रामदासपेठ येथील कॅनॉल रोडची अवस्थाही दनयीन झाली आहे. त्याचप्रकारे लोकमत चौक ते तकीया दरम्यानचा रस्ताही असाच आहे. मोक्षधाम घाट ते एसटी स्टॅण्डच्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील ही केवळ काही उदाहरणे आहेत. वस्तुत: शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची स्थिती पावसानंतर दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. वाहन चालकांना आपला जीव मुठीत ठव्ोून वाहन चालवावे लागत आहे.गिट्टीखदान चौक धोकादायककाटोल रोडवरील गिट्टीखदान चौक सध्या सर्वात धोकादायक बनला आहे. चौकातील दोन्ही बाजूला किमान ५०० मीटरपर्यंत रस्त्यावरील डांबर पूर्णत: गायब झाले असून सर्वत्र गिट्टी पसरलेली आहे. या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जड वाहतुकीसह इतरही वाहने चालतात. रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे वाहने स्लीप होऊन अपघात होऊ शकतो. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.मेट्रो स्टेशनचा रस्ताही ठरतोय डोकेदुखीसीताबर्डी मुंजे चौक येथील मेट्रो स्टेशन हे मेट्रोचे मध्यवर्ती महत्त्वाचे स्टेशन आहे. परंतु या स्टेशनखालून जाणारा रस्ता सध्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अगदी मेट्रो स्टेशनच्या गेटसमोरच्या रस्त्यावरील डांबर निघाले असून रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. त्यात पाणी साचून असते. या ठिकाणी मेट्रो स्टेशनचे कामही सुरू असते. त्यामुळे वाहन चालकांना येथून आपली वाहने चालवताना मोठी काळजी घ्यावी लागते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर