शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

आयएसआयने बनविले नागपूरला टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:30 PM

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला टार्गेट बनविले आहे. आयएसआयने वेगवेगळ्या माध्यमातून नागपुरात मोठ्या प्रमाणात आपले एजंट पेरले आहेत.

ठळक मुद्देअनेक एजंट पेरले महिनाभरात दोनदा कारवाई राज्यातील तपास यंत्रणांमध्ये खळबळ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला टार्गेट बनविले आहे. आयएसआयने वेगवेगळ्या माध्यमातून नागपुरात मोठ्या प्रमाणात आपले एजंट पेरले आहे. मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सीने दहशतवादविरोधी पथकाच्या मदतीने केवळ ३० दिवसात दोन वेळा नागपुरात छापे मारले. केवळ छापेच मारले नाही तर येथे दोन्ही वेळेला आयएसआयचे एजंट पकडले. या कारवाईमुळे राज्यातील तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.७ आॅक्टोबरच्या रात्री नागपुरात आलेल्या मिलिटरी इंटेलिजन्स (एमआय) आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) ब्रह्मोस मिसाईलचा डाटा देण्याच्या आरोपाखाली निशांत अग्रवालच्या मुसक्या बांधल्या होत्या. नागपुरात आयएसआयचा एजंट पकडल्याचे वृत्त ८ आॅक्टोबरच्या सकाळी व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर तब्बल दोन दिवस एमआय आणि एटीएसने नागपुरात विविध ठिकाणी तपास केला होता. या घटनेमुळे राज्यातील तपास यंत्रणा खजिल झाली होती. संघ मुख्यालय, दीक्षाभूमीसारखी अत्यंत संवेदनशील स्थळे असलेल्या आणि देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात अनेक वर्षांपासून आयएसआयचा एजंट मिसाईलच्या प्रकल्पात कार्यरत असतो. तो येथून थेट पाकिस्तान तसेच अमेरिकेला माहिती पुरवितो अन् राज्यातील एटीएस किंवा कोणत्याच गुप्तचर संस्थेला कारवाई होईस्तोवर थांगपत्ता लागत नाही, ही बाब गुप्तचर यंत्रणेला खजिल करणारी ठरली होती. अग्रवाल प्रकरणाचे वृत्त ताजेच असताना गुरुवारी ८ नोव्हेंबरच्या रात्री पुन्हा मिलिटरी एजन्सी आणि मुंबईतील तपास पथकाने नागपूर गाठले. त्यांनी येथील पोलीस आयुक्तांना फक्त कारवाईची पुसटशी माहिती दिली आणि आज शुक्रवारी दुपारी भालदारपुऱ्यात छापा घालून एकाला तर काही वेळेनंतर दुसºयाला पकडले. हे दोघेही आयएसआयचे एजंट असल्याची माहिती खास सूत्रांनी लोकमतला दिली आहे. अवघ्या एक महिन्यात तीन आयएसआयचे एजंट नागपुरात पकडण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणाही हादरल्या आहेत. पाकिस्तानात मुख्यालय असलेल्या आयएसआयने नागपूरला टार्गेट केल्याचे या कारवाईतून थेट संकेत मिळाले आहे. नागपुरात आयएसआय एजंट बिनबोभाट वावरत असताना सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणांना त्याचा थांगपत्ता लागू नये, ही बाब वरिष्ठ पातळीवर चर्चेला आली असून, त्या संबंधाने गृहखाते तसेच पोलीस महासंचालनालयातही आज रात्री उशिरापर्यंत गंभीर मंथन सुरू होते, अशी सूत्रांची माहिती आहे. नागपुरात आणखी किती एजंट दडले आहेत आणि त्यांनी कोणता कट रचला आहे, त्याबाबत तसेच पुढे कारवाईसाठी काय व्यूहरचना करायची, त्यावरही गंभीर चर्चा सुरू असल्याचे समजते.पोलिसांसह, एटीएसलाही दूरच ठेवलेही कारवाई करण्यापूर्वी इंटेलिजन्स एजन्सीच्या अधिकाºयांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आल्याची नोंद केली. मात्र, त्यांना कारवाई कुठे करणार, याबाबत कसलीही कल्पना देण्यात आली नाही. पोलीस पथकाला कारवाईच्या स्थळापासून एक फर्लांग अंतरावर ठेवण्यात आले. कारवाई झाल्यानंतरही नेमके कुणाला पकडले, कुणाला आणखी पकडणार आहे, त्याचीही माहिती रात्री १० वाजेपर्यंत कुणालाच देण्यात आली नव्हती. पोलीसच काय, येथील दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना या कारवाईची कल्पना देण्यात आली नाही. दोघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना कामठीकडे नेल्याची माहिती असून, तेथे त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या कारवाईनंतरही मिलिटरी एजन्सीचे नागपूर व आजूबाजूच्या अनेक ठिकाणी छापेमारी सुरू होती, अशीही सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :ISIआयएसआय