लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तथागत गाैतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त संघमित्रा बुद्धविहारात सामूहिक बुद्धवंदना कार्यक्रमाचे आयाेजन करून तथागत गाैतम बुद्धांना नमन करण्यात आले. संजय कनाेजिया व नगरसेविका संध्या रायबाेले यांच्या हस्ते गाैतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज हडोती, उज्ज्वल रायबाेले, विक्की बोंबले, बिरजू चहांदे, दिलीप तिरपुडे, बालकदास शिंगाडे, सुनील हजारे, दिनेश खेडकर, कार्तिक चव्हाण, आदित्य जगणित, प्रज्वल सोळंकी, अंकित बन्सोड, अभिषेक कनोजे, हर्ष धुर्वे, आकाश बोंबले, अनिकेत चाटे, सतीश जयस्वाल, अजय पंचोली, जया मेश्राम, नंदा आमधरे, पुष्पा तिरपुडे, खोमिन शाहू, छाया रामटेके, प्रमिला देशभ्रतार, जानेश्वरी दमाहे, अमिता गजभिये, आशा खोब्रागडे, उर्मिला यादव, निशा मेश्राम, विशाखा चौधरी आदी उपस्थित हाेते.
.....
मेंढेपठार बुद्ध पाैर्णिमेनिमित्त कार्यक्रम
काटाेल : तालुक्यातील मेंढेपठार येथे बुद्ध पाैर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गाैतम बुद्धांना नमन करून बुद्ध जयंती साजरी केली गेली. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसरपंच अरुणा शिवदास गजभिये यांनी बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्रणय गजभिये, संजय गजभिये, रवींद्र साेमकुवर, गाैतम मडके, सुनीता गजभिये आदी उपस्थित हाेते.
....
जलालखेडा येथे बुद्ध जयंती
जलालखेडा : येथील पंचशील चाैक पुनर्वसन येथे साध्या पद्धतीने बुद्ध जयंती साजरी केली गेली. रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगाला शांतीचा संदेश देणारे गाैतम बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर बुद्धवंदना व पंचशील ध्वजाराेहण करण्यात आले. काेराेनाच्या नियमांचे पालन करीत माेजक्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सरपंच कैलास निकाेसे यांनी प्रत्येकांनी लसीकरण करावे, असे आवाहन केले. यावेळी रमाई संस्थेच्या जयश्री निकाेसे, प्रविणा निकोसे, बेबी निकोसे, अन्नपूर्णा निकोसे, संघमित्रा डोंगरे, राजेंद्र रामटेके, शुभम निकोसे, कृणाल निकोसे, सुधीर रामटेके, प्रीतम निकोसे, प्रफुल निकोसे, हर्षल निकोसे, सुरेंद्र निकाेसे, नीता निकोसे, हार्दिक निकोसे, सोनम निकोसे, राखी निकोसे आदी उपस्थित होते.
....
कळमेश्वर येथे तथागत बुद्धाला अभिवादन
कळमेश्वर : शहरातील महासूर्य बुद्धविहारात काेराेनाच्या नियमाचे पालन करीत साधेपणाने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष स्मृती ईखार यांच्या हस्ते गाैतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रत्येकांनी बुद्धाचे आचरण आत्मसात करा, असे आवाहन केले. यावेळी न. प. उपाध्यक्ष ज्याेत्स्ना मंडपे, नगरसेवक महादेव ईखार, सत्यवान मेश्राम, वनिता भलावी, सरजू मंडपे, प्रकाश आकरे, राहुल वानखेडे, अरुण वाहने आदी उपस्थित हाेते. बुद्ध जयंतीनिमित्त त्रिरत्न बुद्धविहार येथे कार्यक्रम पार पडला.
.....
वागदरा येथे बुद्ध जयंतीनिमित्त वृक्षाराेपण
गुमगाव : वागदरा (नवीन गुमगाव) येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त परिसरात बाेधीवृक्षाचे (पिंपळ) राेपण करण्यात आले. श्रावस्ती बुद्धविहार येथे तथागत बुद्धाच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. श्रावस्ती बुद्धविहार, ग्रीन जीम, बस थांबा परिसर, हरिदास चौधरी स्मृती परिसर व महावितरण कंपनी कार्यालयाच्या परिसरात वृक्षाराेपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शशांक डोंगरे यांनी ५० पिंपळाची राेपटी भेट दिली. यावेळी वामनराव वाळके, पाेलीस कर्मचारी अरविंद घिये, पंकज गोटे, अरविंद वाळके, अशोक पाटील, मधुसूदन चरपे, श्रीराम पराते, नरेंद्र डांगे, चिया गजघाटे, मनुकला वाळके, सुखदेव खोब्रागडे, कल्पना गजघाटे, चंदू हाडके, उदय खोब्रागडे, संजय वाळके, राहुल वानखेडे, मुकुंद जवंजाळ, कनिष्ठ अभियंता रूपेश कापसे, प्रभाकर आष्टनकर आदींची उपस्थिती हाेती.