नागपूर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तौसिफ खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:26 PM2018-09-14T23:26:49+5:302018-09-14T23:29:27+5:30

निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. अगोदर मतमोजणी स्थगित ठेवण्यात आल्याने निकालांची कार्यकर्त्यांना आतुरतेने प्रतीक्षा होती.

Tausif Khan as president of Nagpur Youth Congress | नागपूर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तौसिफ खान

नागपूर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तौसिफ खान

Next
ठळक मुद्देदिग्गजांच्या उमेदवारांना धक्का : धीरज पांडे, इरशाद शेख उपाध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकांदरम्यान झालेल्या गोंधळामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आले. अध्यक्षपदी तौसिफ खान यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी इरशाद शेख यांची निवड झाली. अगोदर मतमोजणी स्थगित ठेवण्यात आल्याने निकालांची कार्यकर्त्यांना आतुरतेने प्रतीक्षा होती.
९ सप्टेंबरला युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान सुरू झाले. निवडणूक प्रक्रियेतून प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहराध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. १२५०० मतदारांपैकी ५०२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान ‘अहबाब कम्युनिटी सेंटर’ येथे बोगस मतदानाचे आरोप झाले होते. यावरुन गोंधळ झाला होता. युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे गुरुवारी मतमोजणी होऊ शकली नव्हती.
अध्यक्षपदासाठी तौसिफ खान, धीरज पांडे यांच्यासह दहा उमेदवारांमध्ये लढत होती. तौसिफ खान यांना १४९१ मते मिळाली, तर धीरज पांडेला १०९९ मते मिळाली. तौसिफ खान हे शहर कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य बशीरभाई यांचे पुत्र आहेत. धीरज पांडे हे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत यांचे समर्थक कृष्णकुमार पांडे यांचे पुत्र आहेत. नितीन राऊत यांचे समर्थन असतानादेखील पांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. धीरज पांडे, इरशाद शेख यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.
शहर महासचिवपदासाठीच्या निवडणुकीत नावेद शेखला सर्वाधिक ५४२ मते मिळाली. केतन ठाकरे व शेख अजहर यांनादेखील यश मिळाले. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उपाध्यक्षपदावर आकाश गुजरची निवड झाली तर कविता यादव या महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरुन निवडून आल्या.

विधानसभा क्षेत्रनिहाय अध्यक्षांची निवड
शहर कार्यकारिणीसोबतच विधानसभा क्षेत्रनिहाय कार्यकारिणीदेखील निवडण्यात आली. स्वप्निल ढोके ५१८ मतांसह मध्य नागपूरच्या अध्यक्षपदी निवडून आले. दक्षिण नागपुरातून बॉबी धोटे (६०५ मते), उत्तर नागपुरातून अनमोल लोणारे (४०१ मते), पूर्व नागपुरातून अक्षय घाटोळे (२१३ मते), पश्चिम नागपुरातून अखिलेश राजन (२४९ मते) व दक्षिण पश्चिममधून मंगेश बढेल निवडून आले.

प्रदेशवर नागपुरातून पाच
प्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकांमध्ये नागपूर शहरातील पाच उमेदवारांना यश मिळाले. कुणाल राऊत उपाध्यक्षपदी निवडून आले. तर भूषण मरसकोल्हे, नेहा निकोसे महासचिवपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. रोहित खैरवार व अजित सिंग हे सचिव झाले आहेत.

उत्तर नागपुरात नितीन राऊतांना धक्का
शहरात युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये शहरातील मोठ्या नेत्यांना धक्का बसला. उत्तर नागपुरात माजी मंत्री व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल यांना प्रदेश उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. तर उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राऊत गटाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. येथे अनमोल लोणारे यांनी बाजी मारली. लोणारे हे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे समर्थक आहेत. विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे हे शहर महासचिव झाले, आपल्या गटात ते दुसऱ्या

 

Web Title: Tausif Khan as president of Nagpur Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.