लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर आकारणी व कर संकलन विभागाने कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ताधारक रोखीने कर जमा करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात धनादेश देतात. परंतु ८८४ मालमत्ताधारकांनी दिलेले ४ कोटी ५८ लाखांचे धनादेश वटलेले नाही. निर्धारित कालावधीत ही रक्कम महापालिकेच्या कर विभागाकडे जमा न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने झोन क ार्यालयांना दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ट ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. कर वसुली करताना रोखी सोबतच धनादेशही स्वीकारले जातात. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत धनादेशाव्दारे कर जमा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु यातील ८८४ मालमत्ताधारकांनी दिलेले धनादेश बँकात वटलेले नाही. कायद्यानुसार धनादेश न वटल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करता येतो. धनादेश न वटलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी थकीत कर न भरल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. मालमत्ताधारकांना मुदतीपूर्वी कर भरणाºयांना सवलत दिली जाते तर मार्चपूर्वी कर न भरल्यास दोन टक्के शास्ती आकारली जाते.२०० कोटींची कर वसुलीस्थायी समितीच्या २०१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर वसुलीचे ३९२.१९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च अखेरीस वसुलीचा आकडा २२५ ते २३० कोटीपर्यंत जाण्याची अपेक्षा होती. परंतु न वटलेले धनादेश व शासकीय कार्यालयाकडील थकबाकीच्या रकमेचे समायोजन विचारात घेता हा आकडा २०० ते २१० कोटीपर्यतच जाण्याची शक्यता असल्याची माहिती सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.अर्धवट व चुकीच्या सर्वेचा वसुलीला फटकाशहरातील मालमत्ता सर्वेक्षणाची जबाबदारी सायबरटेक कंपनीवर सोपविण्यात आली होती. महापालिके च्या रेकॉर्डनुसार शहरात ५.३६ लाख मालमत्ता आहेत. गेल्या काही वर्षात यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सायबरटेक कंपनीने ३.८३ लाख मालमत्तांचा सर्वे केला आहे. यातील २.५९ लाख मालमत्तांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. ७२ हजार नवीन मालमत्ता आढळून आलेल्या आहेत. शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वे झाला असता तर एक लाखाहून अधिक नवीन मालमत्ता आढळून आल्या असत्या. कर वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती.