लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेडिमेड कपड्याच्या व्यापाऱ्याने तयार करायला दिलेले ७ लाख ८९ हजारांचे कपडे घेऊन टेलर पळून गेला. राहुल अमिन (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, तो प. बंगालमधील पोरमिदनामा जिल्ह्यातील राजयवाडी, गोंडचौकी येथील रहिवासी आहे.ईश्वर चौरसी बट्टीघरे (वय ३२, रा. टिमकी दादरा पूल) यांचे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईश्वर गारमेंट आहे. आरोपी राहुल त्यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून रेडिमेड कपडे शिवून देण्याचे काम करीत होता. ११ डिसेंबरला बट्टीघरे यांनी आरोपी अमिनला रेडिमेड कपडे तयार करून देण्यासाठी ७ लाख ८९ हजारांचा माल दिला. मात्र, आरोपीने कपडे शिवून न देता तो सर्व माल घेऊन पळून गेला. त्याची इकडे-तिकडे चौकशी करूनही तो आढळला नाही. त्यामुळे तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.कळमन्यात घरफोडी कळमना, गुलशननगरातील शीतला माता मंदिरजवळ राहणारे रमेश रामविलास पाल (वय ४८) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाखाची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पाल यांनी कळमना ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
टेलरने केला विश्वासघात :आठ लाखांचे कपडे घेऊन पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:36 PM
रेडिमेड कपड्याच्या व्यापाऱ्याने तयार करायला दिलेले ७ लाख ८९ हजारांचे कपडे घेऊन टेलर पळून गेला. राहुल अमिन (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, तो प. बंगालमधील पोरमिदनामा जिल्ह्यातील राजयवाडी, गोंडचौकी येथील रहिवासी आहे.
ठळक मुद्दे नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल