लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात घडलेल्या हत्यांच्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच गुंडांना चांगला धडा शिकवा, असे निर्देश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी क्राईम मीटिंगमध्ये पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांशी चर्चा केली.गेल्या काही दिवसात शहरात हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही घटना तर अगदी किरकोळ वादातून झाल्या आहेत. मात्र या घटनेतील आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. सक्करदरा येथे तडीपार कार्तिक चौबे याने साथीदारांच्या मदतीने गौरव खडतकर याची हत्या केली. वाठोड्यात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नंदनवनमध्ये एका आरोपीने महिलेची हत्या केली. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उपराजधानीला क्राईममुक्त करण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन तसेच हॅण्ड्सऑफ चालविण्यात येत आहे. टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार करून तपास सुरू आहे. या गुन्हेगारांना ठाण्यात आणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे डॉ. उपाध्याय म्हणाले. आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. केवळ प्रतिबंधात्मक कारवाई न करता, गुन्हेगारांविरुद्धचा ठोस पुरावा न्यायालयात सादर करावा. पोलीस निरीक्षकांनी आपल्या हद्दीत मजबूत नेटवर्क बनविण्याची गरज आहे. नागरिक आणि खबऱ्यांकडून आरोपींची माहिती गोळा करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना दिल्या.
गुंडांना धडा शिकवा! नागपूर पोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 9:37 PM
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात घडलेल्या हत्यांच्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच गुंडांना चांगला धडा शिकवा, असे निर्देश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी क्राईम मीटिंगमध्ये पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांशी चर्चा केली.
ठळक मुद्देकठोर कारवाई करावी