शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नागपुरातील जरीपटक्यात शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 9:09 PM

शिकवणीवर्गात येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. याप्रकरणी जरीपटक्यात गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा दुसरा गुन्हा नंदनवनमध्ये दाखल झाला.

ठळक मुद्देनंदनवनमध्ये मैत्रिणीची तक्रार : एकाच दिवशी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकवणीवर्गात येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शिक्षकाने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. याप्रकरणी जरीपटक्यात गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा दुसरा गुन्हा नंदनवनमध्ये दाखल झाला.आरोपी किशोर हूड (वय २९) हा अयोध्यानगरात राहतो. तो जरीपटक्यात शिकवणी वर्ग घेतो. दोन वर्षांपासून मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जाते. आॅगस्ट २०१७ मध्ये त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यावेळी मुलगी अल्पवयीन होती. या दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. वयात आल्यानंतर लग्न करण्याचे त्यांनी ठरवले होते. दरम्यान, त्यांच्यात नियमित शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ लागले. ती आता १८ वर्षांची झाली असून, काही दिवसांपासून त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. तो टाळत असल्याचे लक्षात आल्याने तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्याने लग्नास नकार दिल्यामुळे रविवारी मुलगी जरीपटका ठाण्यात पोहचली. तिच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक मिश्रा यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बलात्काराचा दुसरा गुन्हा नंदनवनमध्ये दाखल झाला. तक्रार करणारी युवती (वय १७) तरोडी (नंदनवन) मध्ये राहते. आरोपी भूषण रमेश इंगळे (वय २५) हा लकडगंजमध्ये राहतो. या दोघांची काही दिवसांपूर्वी फोनवरून ओळख झाल्यानंतर ते नियमित संपर्कात होते. बोलणे, भेटणे, असे प्रकार असताना ती रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ती गणेशपेठ बसस्थानकावर आली. तिने फोन करून आरोपी भूषणला भेटायला बोलवले. भूषण त्याच्या दुचाकीने तेथे पोहचला. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवले. बराच वेळ इकडेतिकडे फिरल्यानंतर आरोपीने तिला नंदनवनमधील आऊटररिंग रोडवरच्या तरोडी गावाजवळ असलेल्या एका धाब्यावर नेले. तेथे एकांत मिळताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. युवतीने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Rapeबलात्कारTeacherशिक्षक