लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने ‘पवित्र’ या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित पदांवरील वर्ग १ ते १२ पर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी तयार करण्यात आलेले ‘पवित्र’ हे वेबपोर्टल आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.विनोद तावडे यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तावडे म्हणाले की यापूर्वी खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती. परंतु, आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. संबंधित विभागामध्ये शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील तर त्या संबंधित विभागाने रिक्त पदांची माहिती ‘पवित्र’ या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे स्थानिक वृत्तपत्रातही जाहिरात प्रसिध्द करावयाची आहे.शालेय शिक्षण विभागाच्या २० जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदरची कार्यपध्दती अवलंबिण्यात आली आहे. ६ जुलै २०१८ पासून पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट)मध्ये शून्यपेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विद्यार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पात्र विद्यार्थी हे रिक्त जागांवर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करू शकतात. नववी ते बारावीसाठीच्या रिक्त जागांवर अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (टेट) मध्ये शून्यपेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.- भरती प्रक्रियेचे टप्पेपवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वत:ची माहिती भरणे.संस्थांनी पवित्र प्रणालीमध्ये माहिती भरणे तसेच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करणे.संस्थांच्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी २० पसंतीक्रम निवडणे.गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध करून देणे.- तांत्रिक अडचण येऊ नये म्हणूनशिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी ‘टेट’ ही परीक्षा १ लाख ७८ हजार उमेदवारांनी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ च्या माध्यमातून अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये याची दक्षता विभागाने घेतली आहे. त्यासाठी उमेदवारांना वेळापत्रक देण्यात आले आहे.