लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, वरिष्ठ व निवड श्रेणी सरसकट प्रशिक्षणाशिवाय लागू करावी, अर्धवेळ शालेय कर्मचारी व अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तात्काळ रोखीने अदा करावा, या मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. शिवलिंग पटवे यांना घेराव करून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, आनंदराव कारेमोरे, प्रमोद रेवतकर, रमेश काकडे, अविनाश बडे, विठ्ठल जुनघरे, संजय वारकर, धनराज राऊत, विजय गोमकर, तेजराज राजूरकर, प्रमोद अंधारे, अरुण कराळे, विष्णू राणे, गोपाल फलके, लोकेश व्होरा, राजेश धुंदाड गुणवंत आत्राम, भीमराव बारसिंगे, बळीराम काळबांडे, प्रकाश शहारे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत बँकेचा संप असल्यामुळे ३ फेब्रुवारीला वेतन बँकेत निश्चित जमा होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी पटवे यांनी दिली. त्याचबरोबर सोमवारी वरिष्ठ व निवडश्रेणी पाञ शिक्षकांच्या याद्या लेखाधिकारी यांना पाठविण्याचे मान्य केले.
नागपुरात शिक्षक संघटनेचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 10:01 PM