अनिल सोले यांची माहिती : उत्सवी कर्ज योजनानागपूर : १२ वर्षांतील चढउताराच्या टप्प्यात भागधारक आणि ठेवीदारांच्या विश्वासावर शिक्षक सहकारी या शेड्युल बँकेने १५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे पालन करीत बँक सर्व आघाड्यांवर प्रगती करीत असून चालू आर्थिक वर्षात १० ते ११ कोटी नफा कमविण्याचे लक्ष्य असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आ. अनिल सोले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. सोले म्हणाले, गत आर्थिक वर्षात ११.८५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून मागील आर्थिक वर्षांपर्यंतचा तोटा तसेच नियमानुसार आवश्यक तरतुदी केल्यानंतर ६२.०६ लाख रुपयांचा शुद्ध नफा कमविला आहे. अंकेक्षण वर्ग ‘अ’ मिळाला आहे. सीआरएआर १४.५७ टक्के, नेटवर्थ ७१.०८ कोटी, ९५२.५१ कोटी ठेवी असून ५५८.७१ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेची अंशपुंजी ५२ कोटी, ठेवी १ हजार कोटी, कर्ज वाटप ६०० कोटी, नेट एनपीए शून्य टक्के, नेटवर्थ ८० कोटींवर आणि सीआरएआर १५ टक्यांवर नेण्याचे लक्ष्य आहे. बँकेने उत्सवी योजना सुरू केल्या आहेत. १० टक्के व्याजदरावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी कर्ज, सोलर आणि डॉक्टर प्लस योजना आहेत. बँकेच्या अद्ययावत सेवा आहेत. पत्रपरिषदेत बँकेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाजी मेंडजोगे, संस्थापक सदस्य प्रभाकर चेडगे, उपाध्यक्ष अनिल मुळे, तज्ज्ञ संचालक सीए संजय नारके, संचालक माधव नेरकर, रंगराव मानकर, प्रवीण दटके, डॉ. कल्पना पांडे, मेश्राम, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप दीक्षित, महाव्यवस्थापक उपेंद्र पोफळी, विजय अग्रवाल उपस्थित होते. (वा.प्र.)
शिक्षक बँकेचा १५०० कोटींचा व्यवसाय
By admin | Published: October 02, 2016 2:59 AM