नागपूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित अजंठा हॉल येथे आयोजित त्रैवार्षिक अधिवेशन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळ्यात १३ महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. समितीचे राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोनेकर, भाजपचे संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे, शिक्षण समितीचे सभापती उकेश चव्हाण, जिल्हा परिषदेच्या सदस्य छाया ढोले, शिक्षण समितीचे नेते शिवाजीराव साखरे, सरचिटणीस उदय शिंदे, कार्याध्यक्ष विजय कोंबे, उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश पाबळे, सहसचिव राजू गोतमारे, शरद इटकेलवार आदी उपस्थित होते. अधिवेशनात महिला शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात कीर्ती पालटकर, (उमरेड) मीनल देवरणकर (कुही), भुमेश्वरी खोंडे (भिवापूर), निशा परते (पारशिवनी), माला सरोते(रामटेक), भारती साखरकर (मौदा), विजया पोहाणे (काटोल), किरण वंजारी(सावनेर), प्रतिभा कन्हेरे(कळमेश्वर), हसिना शेख (नरखेड), ममता मेन (हिंगणा), माधुरी देशमुख (नागपूर), साधना प्रसाद (कामठी) आदींचा समावेश आहे. यावेळी सुधीर पारवे, उकेश चव्हाण, श्रीकांत देशपांडे आदींनी मार्गदर्शन केले. अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून लीलाधर ठाकरे यांची तर सरचिटणीसपदी अनिल नासरे यांची फेरनिवड करण्यात आली. सूत्रसंचालन अनुराधा रघुते यांनी, प्रास्ताविक लीलाधर ठाकरे यांनी तर आभार दिनकर उरकांदे यानी मानले. कार्यक्रमासाठी अनिल नासरे, विलास काळमेघ, सतीश देवतळे, धनंजय चन्ने, नंदकिशोर वंजारी, रमेश कर्णेवार, सुरेंद्र कोल्हे, धनराज शेंडे, हेमंत तितरमारे, धर्मेद्र गिरडकर, दिगांबर शंभरकर, राजेंद्र कुकडे, अनिल देशभ्रतार, सुरेश श्रीखंडे, प्रकाश सव्वालाखे, विजय बरडे, अशोक बांते, आशोक तोंडे, ईश्वर ठाकरे नारायण चाफल, अनिल पन्नासे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
शिक्षक समितीच्या अधिवेशनात शिक्षिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 3:07 AM