कुही : कोरोना काळापासून गेली तीन सत्र शाळा बंद आहे. आता ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र, या ऑनलाईन वर्गामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा शिक्षकांनी प्रामाणिकपणे कार्य करीत राहावे, असा सूर शुक्रवारी झालेल्या मुख्याध्यापक सहविचार सभेत व्यक्त करण्यात आला.
मुख्याध्यापक वानखेडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. गट शिक्षण अधिकारी शारदा किनारकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष राऊत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. केंद्रप्रमुख सुनील चावके यांनी केले. याच सभेत केंद्रातील विविध समस्येवर चर्चा करण्यात आली. तसेच गतवर्षी मिळालेले अनुदानात अखर्चित राहिलेला निधी दिलेल्या पत्रात भरून परत करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे संचालन संगीता शिवणकर यांनी, तर प्रवीण फाळके यांनी आभार मानले. सभेला प्रदीप घुमडवार, सुलभा काळे, डोंगरे, चाचेरकर, रूपचंद ठवकर, मंदा पाटील, आदी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.