कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धुलाई करत अर्धशतकी भागीदारी केली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही सोपे झेल सोडून फलंदाजांना मदतच केली. अखेर चहलने कर्णधार फिंचला बाद करीत पहिला धक्का दिला, चहलनेच स्टीव्ह स्मिथला स्वस्तात बाद केले.
फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला टी. नटराजनने अडकवून अडचणींमध्ये भर टाकली. नटराजनचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला मॅक्सवेल पहिला बळी ठरला. डार्सी शॉर्टलाही नटराजनने टिपले. चहलने मॅथ्यू वेडला जाळ्यात अडकवत पाचवा धक्का दिला, यानंतर ऑस्ट्रेलिया सावरु शकला नाही. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ तर दीपक चाहरने एक बळी घेतला.