शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

संघ देणार ‘आॅनलाईन’ बौद्धिक

By admin | Published: April 13, 2015 2:20 AM

'दैनंदिन उपस्थितीमध्येच संघबळ दडले आहे', या डॉ. हेडगेवार यांच्या वक्तव्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधील

स्वयंसेवकांना मिळणार एका ‘क्लिक’वर मार्गदर्शन : ‘कंट्रीवाईड क्लासरूम’पासून प्रेरणायोगेश पांडे ल्ल नागपूर'दैनंदिन उपस्थितीमध्येच संघबळ दडले आहे', या डॉ. हेडगेवार यांच्या वक्तव्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधील बौद्धिकांमध्ये वारंवार आठवण करून दिली जाते. परंतु बदलत्या काळात संघदेखील कात टाकत असून तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांना जास्तीतजास्त प्रमाणात आकर्षित करण्यासाठी शाखांमधील बौद्धिक ‘आॅनलाईन’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा संघाचा मानस आहे. शिक्षणक्षेत्रातील ‘कंट्रीवाईड क्लासरूम’पासून याची प्रेरणा घेण्यात येत असून या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संघविचार पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आजच्या तारखेत तरुणाईमध्ये इंटरनेट हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. आजच्या युगातील तंत्रज्ञानाची शक्ती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘हायटेक’ प्रणाली स्वीकारली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत संघ स्वयंसेवक पोहोचत आहेत. धकाधकीच्या जीवनामुळे तरुण शाखेत येऊ शकत नसले तरी त्यांना जोडून ठेवण्यासाठी संघाने ‘सोशल मीडिया’ची मदत घेतली आहे. संघाच्या संकेतस्थळावर जाऊन एका ‘क्लिक’वर स्वयंसेवक होण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात यामुळे शाखांची संख्या १८ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.परंतु नवीन पिढीपर्यंत संघविचार सखोल पद्धतीने पोहोचविण्यासाठी शाखापर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांसाठी शाखांमध्ये देण्यात येणारे ‘बौद्धिक’ स्वयंसेवकांना एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावे असा विचार संघामध्ये जोर धरायला लागला आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याला गंभीरतेने घेतले जेष्ठ पातळीवर यावर चर्चा सुरू आहे.भविष्याचा विचार करणे आवश्यककाळाची गरज लक्षात घेता तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक झाले आहे. संघविचार समाजात पोहोचविण्यासाठी ‘आॅनलाईन’ बौद्धिक उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याच्या सूचना सर्व स्तरांतून आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यानुसार लवकरच यासंदर्भात पावले उचलण्यात येतील व नजीकच्या भविष्यात ‘आॅनलाईन’ बौद्धिक जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे मत संघाचे अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख जे.नंदकुमार यांनी व्यक्त केले.