शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:51 PM

यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देआवक वाढली, भाव कमी : खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.१०० किलोमागे १२५ रुपये भाडे, दररोज २० ते २५ ट्रकची आवकयावर्षी महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांदा मोफत वाटल्याचे आणि भाववाढीसाठी आंदोलन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण कांद्याचे उत्पादन मुबलक झाल्यामुळे त्यांना भाव मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कळमन्यात औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नाशिक या भागातून पांढरे आणि लाल कांदे विक्रीस येत आहेत. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे. त्यातच पांढऱ्या कांद्याची आवक कमी असल्यामुळे कळमन्यात भाव दर्जानुसार प्रति किलो ७ ते १२ रुपये आहेत. तसेच लाल कांद्याची आवक वाढली असून भाव ५ ते ९ रुपये आहेत. मोठ्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. खराब कांद्याला ३ ते ५ रुपये भाव आहे. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे.भाडेखर्चामुळे नगर, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदे नागपुरात आणणे शक्य नाही. स्थानिक बाजारात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड आहे. मालवाहतुकीचा खर्च क्विंटलमागे १२५ रुपये येतो. नागपुरात प्रति क्विंटल ७०० रुपये भाव असलेल्या कांद्याला नगर, औरंगाबाद येथे ३०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. भाव हजार ते १५०० रुपये मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असे गुलवाडे यांनी स्पष्ट केले. ठोकमध्ये भाव कमी असतानाही किरकोळ बाजारात जास्त भावात विक्री होत आहे.नागपुरात येताहेत जुने बटाटेउत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे नवीन पीक निघाले आहे. पण कोल्ड स्टोरेजमधील जुने बटाटे कळमन्यात विक्रीस येत आहे. भाव ६०० ते ८०० रुपये क्विंटल आहेत. तिन्ही राज्यातून कळमन्यात बटाटे आणण्यासाठी क्विंटलमागे २०० रुपये खर्च येतो. त्यामुळे बटाटे कळमन्यात आणणे शेतकऱ्यांना परवडत नाही. पण जास्त उत्पादनामुळे कळमन्यात आवक वाढली आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी