शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

नागपुरातील तहसील कार्यालय बंद : प्रशासकीय अधिकारी हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 8:05 PM

उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या चेंबरला कुलूप लावण्यात आले असून तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाला कुलूपसर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकारी हादरले आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या चेंबरला कुलूप लावण्यात आले असून तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्याकडे दहा क्वारंटाईन सेंटरची जबाबदारी होती. त्यांच्या जेवणापासूनची सर्व व्यवस्था ते पाहत होते. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरला भेटी देण्यापासून तर कोरोनाशी संबंधित सर्व बैठकांनाही त्यांना उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून महापालिका, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग आदी अधिकाऱ्यांशी त्यांचा संबंध यायचा. सोमवारपासून त्यांना बरे वाटत नव्हते. बुधवारी त्यांनी आपली तपासणी करून घेतली. तेव्हा ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयच नव्हे तर मनपासह सर्वच प्रशासकीय अधिकारी हादरलेले आहेत. शुक्रवारी सकाळीच संबंधित अधिकाऱ्यांचे चेंबरसह उपविभागीय कार्यालय, तहसील ऑफीस सॅनिटाईझ करण्यात आले. तहसील कार्यालयातील सर्व कामकाज बंद करण्यात आले. परिसरातील अर्जनवीस व स्टॅम्प विक्रेत्यांना परत पाठवण्यात आले. त्यामुळे आज संपूर्ण दिवस तहसील कार्यालय बंद होते. उद्या शनिवार आणि रविवार असल्याने कार्यालय बंदच राहील. तहसील ऑफिस सील करण्याबाबत अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, आज दिवसभर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपणही पॉझिटिव्ह तर नाही ना, अशी भीती दिसून आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याTahasildarतहसीलदार