लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेमका काय आहे, का तयार करण्यात येत आहे, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. थेट प्रतिक्रिया व सल्ले मागण्यात आले आहेत. बृहत् आराखडा म्हणजे काय असतो याचीच अनेक विद्यार्थी पालकांना माहिती नाही. अशा स्थितीत प्रशासनाची ही भूमिका पाहता बृहत् आराखड्याबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.बृहत् आराखडा नेमका काय असतो, त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश असतो हे विद्यार्थी-पालकांना सांगण्याची तसदीदेखील विद्यापीठाने घेतलेली नाही. यंदा प्रतिक्रिया ‘आॅनलाईन’ मागविण्यात आल्या आहेत. मात्र अनेक विद्यार्थी-पालक अद्यापही इंटरनेटपासून दूर आहेत. शिवाय विद्यापीठातीलच काही शिक्षक ‘आॅफलाईन’ आहेत. असा स्थितीत ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येतील कशा हादेखील प्रश्न आहेच.केंद्रदेखील बनविले नाहीतविद्यापीठ प्रशासनाने सर्वांना ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया नोंदविण्यास सांगितले आहे. मात्र यात काही तांत्रिक अडचण आली तर त्याचे निराकरण करण्यासाठी शहर तसेच ग्रामीण क्षेत्रांतील महाविद्यालयांत केंद्र तयार करण्यात आलेले नाहीत.चार वर्षांनंतर आली आठवणविद्यापीठाने २००८ साली पहिल्यांदाच बृहत् आराखडा तयार केला होता. या आराखड्यात विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगाराची स्वप्ने दाखविण्यात आली होती. मात्र नेमक्या किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने अजूनही दिलेली नाही. बृहत् आराखड्याच्या नावाखाली डोळे मिटून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या उच्च शिक्षणाचा स्तर खालावताना दिसून येत आहे.हा असतो बृहत् आराखडायेणाऱ्या कालावधीत विद्यापीठाचा विकास नेमका कसा व्हावा, विद्यार्थ्यांना कोणते शिक्षण देण्यात येईल, कशाप्रकारचे नवे अभ्यासक्रम सुरू होतील, कौशल्य विकासासाठी काय पावले उचलली जातील या बाबींचा बृहत् आराखड्यात समावेश असतो. सोबतच उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावणे, रोजगारासाठी प्रयत्न करणे, या बाबींना डोळ्यासमोर ठेवूनदेखील सर्वांच्या प्रतिक्रिया मागवून मग एक योजना तयार करण्यात येते. सर्वसमावेशक विकास असा उद्देश असलेली ही योजना दीर्घ कालावधीसाठी असते.
बृहत आराखडा म्हंजी काय रं भाऊ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 11:27 PM
राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ४ वर्षांनंतर बृहत् आराखडा तयार करण्याची आठवण आली आहे. यासाठी विद्यापीठाने शिक्षकांसोबतच विद्यार्थी, पालक यांच्याकडूनदेखील ‘आॅनलाईन’ प्रतिक्रिया मागविल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे बृहत् आराखडा नेमका काय आहे, का तयार करण्यात येत आहे, याची कुठलीही माहिती दिलेली नाही. थेट प्रतिक्रिया व सल्ले मागण्यात आले आहेत. बृहत् आराखडा म्हणजे काय असतो याचीच अनेक विद्यार्थी पालकांना माहिती नाही. अशा स्थितीत प्रशासनाची ही भूमिका पाहता बृहत् आराखड्याबाबत विद्यापीठ किती गंभीर आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : माहितीशिवायच मागण्यात येत आहेत बृहत् आराखड्यावर प्रतिक्रिया