मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरातील उद्यानात मौैजमजा करण्याचा आग्रह बच्चे कंपनी पालकांकडे करीत आहे. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था बघता ‘सांगा खेळायचे कसे ?’ असा प्रश्न बच्चे कंपनीकडून पालकांना केला जात आहे. महापालिकेने शहरात उद्याने उभारली आहेत. मात्र, या उद्यानांची पाहिजे तशी देखभाल केली जात नाही. शहरातील महापालिकेच्या भकास उद्यानाचे भयाण वास्तव समोर आले. बहुतांश उद्यानांच्या सभोवताल नागरिक कचरा आणून टाकतात. कचरागाडीही येथील कचरा दररोज उचलून नेत नाही. काही ठिकाणी कारंजे लावले आहेत; मात्र, त्यापैकी बहुतांश बंद आहेत. ‘लोकमत’ने नंदनवनमधील त्रिशताब्दी बालोद्यानाला भेट देऊन तेथील वास्तव जाणून घेतले तेव्हा अनेक असुविधा दिसून आल्या. शिवाय देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष दिसून आले.
बहुतांश खेळणी तुटलेलीउद्यानातील बहुतांश खेळणी तुटलेली आहेत. त्यामुळे लहानग्यांना उद्यानात खेळताना आई-वडिलांना त्यांच्यावर देखरेख ठेवावी लागले. तुटलेल्या खेळण्यामुळे गंभीर दुखापतीची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्यास धोकाबंद फाऊंटेनमुळे कित्येक दिवसांपासून येथे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रुपये खर्चून फाऊं टेन तयार केले, बंद ठेवून उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.