शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संस्कार शिकविणारे मंदिर अखेर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:37 AM

अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा.

ठळक मुद्देनिराधारांचे छत्र हरविले : प्लॅटफॉर्म शाळेची शेवटची घरघरही संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनाथ, निराधार, व्यसनी, चोºयामाºया करून जगणाºया आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मलाच आयुष्य समजून जगण्याची दिशा हरविलेल्या असंख्य निराधार मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजवणारे ठिकाण म्हणजे नागपूरची प्लॅटफॉर्म शाळा. परंतु दुर्दैवाने संस्कारचे हे मंदिर अखेर कुलूपबंद झाल्याने शहरातील समाजभान जपणाºयांचे मन गहिवरले. विश्वहिंदू जनकल्याण परिषदेला या रोपट्याचे वटवृक्ष करण्यात अपयश आल्यामुळे, येथे वास्तव्यास असलेल्या निरागस विद्यार्थ्यांचे छत्रच हरविले आहे.लोहमार्ग पोलीस, नागपूर महापालिका व विश्व हिंदू जनकल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया परिसरात २३ जून २०१० साली प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर सुरू करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन अधीक्षक रवींद्र सिंगल यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन विश्व हिंदू जनकल्याण परिषदेला या शाळेची जबाबदारी सोपविली होती. एक दोन करता करता प्लॅटफॉर्मवर भटकणारी शेकडो मुले या शाळेत पोलिसांच्या माध्यमातून येत गेली. येथे भटकंती करणाºया मुलांना निवारा मिळाला. त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याची सोय झाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार आणि प्रेमाचा ओलावाही मिळाला. या शिस्तीत ज्यांना आयुष्य घडवायचे होते, ती मुले टिकली आणि शिक्षणाच्या प्रवाहात पुढे गेली. यातीलच एक उदाहरण म्हणजे बीअरबार मध्ये ग्लास साफ करणारा एक मुलगा आज इंजिनीअरिंगच्या तिसºया वर्षाला शिकतोय. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी त्यावेळी प्रमुख म्हणून श्रीकांत आगलावे यांना दिली होती. त्यांनी चुकीच्या मार्गावर भटकणाºया मुलांना एका प्रवाहात आणले होते. त्यासाठी समाज भावना जपणाºयांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले होते. मुलांचे पूर्ण नाव व पत्ता नसल्याने, शाळेत दाखल करून घेण्यासाठी वडील म्हणून स्वत:चे नाव लावले होते. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. परंतु गेल्या दीड वर्षांपासून आगलावे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्यामुळे या कार्यातून त्यांना मुक्त करण्यात आले. तेव्हापासून ही जबाबदारी विश्वहिंदू परिषदेच्या जनकल्याण समितीकडे सोपविण्यात आली. ते गेल्यानंतर एक ते दीड वर्षात ही शाळा बंद पडली. एखाद्या संस्थेतला माणूस बदलला की त्या संस्थेची रचना बदलते. तसेच काहीसे या प्लॅटफॉर्म शाळेचे झाले.अतिशय वेदनादायीदु:ख होतेय या शाळेचा शेवट बघून. अनेकांचे शिक्षण पूर्ण झाले नाही. हे विद्यार्थी निदान ते गॅॅ्रज्युएटपर्यंत शिकले असते तर आपल्या पायावर उभे राहू शकले असते. येथे त्यांना घरचे वातावरण मिळाले होते.- श्रीकांत आगलावे, माजी प्रकल्प प्रमुख, प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरबाल कल्याण समितीने तोडले मंदिरशाळेत बाल कल्याण समितीचे लोक आले होते. त्यांनी मुलांची चौकशी केली. मुलांनी बालकल्याण समितीला लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. लहान मुलांना बाल कल्याण समिती घेऊन गेली. दुसºया दिवशी आम्हाला विचारले मोठ्या मुलांना कसे ठेवले. त्यांनाही आमच्या स्वाधीन करा, बाल सुधार गृहात ठेवू असे सांगितले. काही मुलांचे पालक आले. त्यांना त्यांच्या पालकांना हस्तांतरीत केले. ३ ते ४ मुलांना बालकल्याण समितीचे लोक घेऊन गेले. त्याचबरोबर १ तारखेपासून महापालिकेचे सर्व शिक्षा अभियान बंद झाले. त्यामुळे कर्मचाºयांचे पगारही बंद झाले. सोबतच समितीने आमच्याकडे परवानाची विचारणा केली. आमच्याकडे परवाना नव्हता. आम्ही परवान्यासाठी अर्ज केला, तो आला की पुन्हा शाळा सुरू करू.-हरीश हरकरे, कार्याध्यक्ष, विश्व हिंदू परिषद जनकल्याण समिती