शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जानव्हीच्या जामिनास तात्पुरती स्थगिती

By admin | Published: March 24, 2017 2:54 AM

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवरील (मणप्पुरम गोल्ड लोन)

मणप्पुरम गोल्ड दरोडा प्रकरणनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवरील (मणप्पुरम गोल्ड लोन) दरोड्यातील मास्टर मार्इंड व बिहार येथील कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंगची याची पत्नी जान्हवी जामीन आदेशाला तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. जान्हवी सुबोध सिंग (३५) रा. चिस्तीपूर नालंदा बिहार हिला २१ मार्च रोजी सशर्त जामीन मंजूर केला होता. दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मदत केल्याचा जान्हवीवर आरोप आहे. तिला १ नोव्हेंबर २०१६ रोजी जरीपटका पोलिसांनी चंडी पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मदतीने अटक केली होती. याच गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी सूरजसिंग ऊर्फ सन्नी सुशीलकुमारसिंग (२१) रा. आदलवाडी हाजीपूर बिहार आणि धरमवीरकुमार ऊर्फ मुकेशप्रसाद ऊर्फ मुकेशकुमार ऊर्फ बाबा धुरखेलीप्रसाद ऊर्फ नागेश्वरप्रसाद (४०) रा. चिस्तीपूर यांना २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पश्चिम बंगालच्या बराकपूर जिल्हा कारागृहातून जरीपटका पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते. दरोड्याची घटना नारा रोडवरील कुकरेजा कॉम्प्लेक्सस्थित मणप्पुरम गोल्ड लोन कार्यालयात २८ सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली होती. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ९ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ३० किलो ९०६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ लाख १ हजार २०२ रुपये रोख, असा एकूण ९ कोटी ३३ लाख १ हजार २०२ रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. जानव्ही हिने दिलेल्या कबुलीवरून दरोड्याचा हा गुन्हा सुबोधसिंग ऊर्फ अभिषेक ईश्वरीप्रसादसिंग (३५) रा. चिस्तीपूर, धरमवीरकुमार, मिथलेशकुमार ऊर्फ बल्ली मुसाफीर यादव (३१) रा. कंधूपिपर, मनिषसिंग राजारामसिंग (२४) रा. हसरगंज, रोशन मिथिलेश प्रसाद (३०) रा. मदुराई बिहार, पुल्लूसिंग ऊर्फ राजीवसिंग अमरिंदरसिंग (३५) रा.शेखोपूर, सूरजसिंग आणि रंजन यादव (४०) रा. कादरीगंज बिहार यांनी केल्याचे निष्पन्न झाले.दरोड्यानंतर मुख्य सूत्रधार सुबोध सिंग हा लुटीच्या मालासह आपल्या घरी गेला होता. त्याने दरोड्याची माहिती आपली पत्नी जानव्हीला दिली होती. परंतु जानव्हीने ही माहिती पोलिसांना न देता गुन्हेगारी कट रचून आरोपींना फरार होण्यास मदत केली . त्यामुळे तिला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. जानव्ही ही नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना तिने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो २१ मार्च रोजी न्यायालयाने तो मंजूर करून जानव्हीला सशर्त जामीन दिला होता. दरोड्याचा हा गुन्हा गंभीर असून आरोपी जान्हवीला फरार आरोपींबाबत संपूर्ण माहिती आहे. ही माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे, तपास अपुरा आहे. त्यामुळे जान्हवीच्या जामीन आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयात आव्हान करता यावे, यासाठी तिचा जामीन तात्पुरता स्थगित करण्यात यावा, अशी विनंती सरकार पक्षाकडून करण्यात आली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सी. एम. बहादुरे हे आहेत. (प्रतिनिधी)