लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. याची दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने महापालिकेतर्फे दहाही झोनमध्ये दहा ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या फिवर क्लिनिकमध्ये तज्ज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने आधीच धडकी भरते. अशा किरकोळ स्वरूपाच्या आजारांच्या तपासणीकरिता व त्यावरील उपचाराकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमधील मनपाच्या एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे फिवर क्लिनिक सुरू झाले आहेत.या फिवर क्लिनिकमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यात येईल.येथे रुग्णावर आवश्यक उपचार केले जाईल. आवश्यकता असल्यास त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तीव्र स्वरूपाचे ताप व अन्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याला पुढील तपासणीकरीता पाठविण्यात येईल.याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना मनपाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करता येईल. यासंबंधी मनपाद्वारे सर्व खासगी रुग्णालय व हॉस्पिटलना सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.फिवर क्लिनिक सुरू करण्यात आलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रअ.क्र. झोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र१ लक्ष्मीनगर जयताळा२ धरमपेठ के.टी. नगर३ हनुमाननगर नरसाळा४ धंतोली बाबुलखेडा५ नेहरूनगर नंदनवन६ गांधीबाग मोमीनपूरा७ सतरंजीपुरा जागनाथ बुधवारी८ लकडगंज पारडी९ आसीनगर कपिल नगर१० मंगळवारी इंदोरा