लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी आज ऑनलाईन पत्रकारांशी संवाद साधला. संवादात त्यांनी नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनला आठ अर्ज आल्याचे सांगून त्यापैकी सहा अर्ज योग्य असल्याची माहिती दिली.महिनाभरात नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. त्या निविदा उघडून अंतिम निविदाकर्त्यांची निवड केल्यानंतर तीन वर्षानंतर नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास होणार आहे. या कामासाठी आयआर एसडीसी ला मध्य रेल्वेने ४५ हजार चौरस मीटरची जागा दिली आहे. मुख्यालयाने तो प्लॅन मंजूर केला आहे. रेल्वे आणि आयआरएसडीसीच्या दरम्यान ही योजना अंतिम टप्प्यात आहे. या योजनेत ३७२ कोटींचा खर्च आहे. डीआरएम सोमेश कुमार यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाने फोटोच्या माध्यमातून मुख्य संकेतकाच्या देखरेखीखाली पोर्टलच्या माध्यमातून यंत्रणा सुरू केली. या सुरक्षा कार्यात, व्यापारात, मोबिलिटी, असेट मध्ये वेळेचे पालन करण्यात आले. या ६८ विभागांमध्ये नागपूर विभाग ११ व्या ठिकाणी राहिला अशी माहिती त्यांनी दिली.
कधीही जाऊ शकता रेल्वेस्थानकावरलोकमत'ने विचारलेल्या प्रश्नावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी उत्तर दिले ते म्हणाले तुम्ही वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांची परवानगी घेऊन कधीही रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करू शकता तुम्हाला कुणीही रोखणार नाही. त्यामुळे आता परवानगी घेऊन कुणीही रेल्वे स्थानकाच्या आत जाऊ शकणार आहे.