शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:05 AM

लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली.

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मांडली नाराजी : मतभेदांसोबतच मनभेददेखील दिसले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली. 

सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा सुरू झाल्यानंतरदेखील सभागृहातील ३० ते ४० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषण करताना बऱ्याच नेत्यांनी निवडणूक काळात कॉंग्रेसच्या प्रचार प्रणालीतील त्रुटींवर बोट ठेवले. माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी तर पूर्व नागपुरातील एका ब्लॉक अध्यक्षाने बूथ कार्यकर्त्यांच्या निधीमध्येच गडबड केल्याचा आरोप केला. यात त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र पूर्व नागपुरातच काम पाहणाऱ्या एका महिला ब्लॉक अध्यक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. हुसेन यांचे भाषण सुरू असतानाच ही महिला कार्यकर्त्यांमधून उठून संतापानेच थेट मंचावरच गेली व हुसेन यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. हुसेन यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. अखेर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता प्रामुख्याने दिसून आली. 
या मेळाव्याला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश महासचिव डॉ.बबन तायवाडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, माजी शहराध्यक्ष शेख हुसैन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.तिकीट देताना कार्यकर्त्यांना विचारता का ?उमाकांत अग्निहोत्री आपले मत मांडत असताना पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यांच्या पाठीशी सर्व उभे राहू, असे प्रतिपादन केले. यावेळी सभागृहातील काही कार्यकर्ते उभे झाले. निवडणूकांमध्ये नेत्यांना तिकीट देत असताना कार्यकर्त्यांना विचारता का, असा संतप्त सवाल केला. इतर कार्यकर्त्यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. अखेर अग्निहोत्री यांनी मिनीटभरातच आपले बोलणे आवरते घेतले.वंजारी आक्रमक, स्वपक्षीयांवरच टीकास्त्रअभिजित वंजारी यावेळी आक्रमक पवित्र्यात दिसून आले. कॉंग्रेस पक्षात बाहेरील लोकांना कुठलाही ‘स्कोप’ नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी गुलाम म्हणूनच वागणूक दिली आहे. त्यांनी केवळ आपलीच घरे भरली. अशा नेत्यांपासून पक्षाला वाचविले पाहिजे. स्थानिक नेत्यांमुळेच कॉंग्रेस बुडाली असा आरोप करत कुणाचेही नाव न घेता ‘टोपीबाज’ नेत्यांपासून पक्षाला मुक्त करा, अशी भावना त्यांनी मांडली.शेळकेंची नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकामेळाव्यामध्ये नगरसेवक बंटी शेळके यांना बोलू द्या, अशी मागणी करत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड सुरू केली. अखेर नाना पटोले यांच्याऐवजी शेळकेंना बोलण्याची संधी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत नेत्यांमुळे नव्हे तरुण कार्यकर्त्यांमुळे मतं मिळाली. कॉंग्रेसचे नेते तरुण कार्यकर्त्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. शहरातील सर्व ‘बूथ’वरून एक जण गृहित धरला तरी मेळाव्याला हजारहून अधिक जण सहज येऊ शकले असते. मात्र रिकाम्या खुर्च्या बरंच काही सांगत आहेत, असे म्हणत त्यांनी पक्षातीलच नेत्यांना चिमटा काढला. नगरसेवक मनोज सांगोळे हेदेखील भाषणासाठी उभे झाले. माझे भाषण फारसे चांगले नाही, त्यामुळे नाराज झाले तर बूट मारू नका, अशी विनंतीच त्यांनी कार्यकर्त्यांना केली.संकल्प मेळाव्यातदेखील दुफळीलोकसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसचे नेते मतभेद विसरून एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र या संकल्प मेळाव्याला नुकताच कॉंग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चा राजीनामा दिलेले नितीन राऊत, अनिस अहमद, गेव्ह आवारी इत्यादी नेते अनुपस्थित होते.पटोले, गजभिये करणार याचिकादरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघात आपला विजयच झाल्याचा दावा, किशोर गजभिये यांनी केला. ‘ईव्हीएम’च्या घोळामुळे तांत्रिक पराभव झाला आहे. यासंदर्भात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणार असल्याची माहिती गजभिये व नाना पटोले यांनी दिली.आंदोलनासाठी तयार रहायावेळी विकास ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याची सूचना केली. प्रशासन व सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा व आंदोलनांसाठी सज्ज रहा असे ते म्हणाले. निवडणुकांसाठी सर्वांंनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांत मतभेद असले तर चालतील पण मनभेद नको. सर्वांनी कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे आवाहन डॉ.बबन तायवाडे यांनी केले. लोकसभेसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत केली मात्र त्याला यश आले नाही. विधानसभेसाठी तरुण उमेदवारांना तिकीट दिले पाहिजे, असे प्रतिपादन अतुल कोटेचा यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर