शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

नागपुरातील अजनीत धार्मिक स्थळ तोडण्यावरून तणाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:41 AM

अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, यानंतरही काही संघटनांनी विरोध केल्यामुळे मुदत देऊन पथक पुढे सरकले.

ठळक मुद्दे महापालिकेची धंतोली, धरमपेठ, सतरंजीपुरामध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, यानंतरही काही संघटनांनी विरोध केल्यामुळे मुदत देऊन पथक पुढे सरकले.पथकाने दुपारी राजाबाक्षा येथील विश्राम सोसायटीमधील एक धार्मिक स्थळ तोडले. अजनी रेल्वे कॉलनी रोडवरील अजनी रेल्वे ट्रॅफिक पोलीस स्टेशन गार्डनला लागून असलेल्या फूटपाथवरील एक छोटे धार्मिक स्थळ हटविण्यात आले. नरेंद्रनगर सुंदरबन रिंग रोड येथील एक व नरेंद्रनगर पुलाजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यात आले. याशिवाय अन्य पथकांनी धरमपेठ व सतरंजीपुरा झोन अंतर्गत देखील कारवाई केली. ही कारवाई सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजय कांबळे, अभियंता मालवे, जमशेद अली, संजय शिंगणे, शरद इरपाते व पथकाने केली.अधिकारी मागताहेत दस्तावेज धार्मिक स्थळ तोडण्यासाठी पोहचलेल्या पथकाला विरोध करणाऱ्या नागरिकांना अधिकारी दस्तावेज मागत आहेत. १९६० पूर्वीच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. कागदपत्रे सादर केली नाहीत तर कारवाई होत आहे.घाट रोडवर शेकडो नागरिक जमले धंतोली झोन अंतर्गत इमामवाडा येथील घाट रोड सरदार पटेल चौकातील धार्मिक स्थळ तोडण्यात येत असल्याची माहिती मिळताच नागरिक गोळा होणे सुरू झाले. सायंकाळी ४ च्या सुमारास महापालिकेचे पथक टिंबर मार्केटच्या पटेल चौकात कारवाईसाठी पोहचताच नागरिक संतापले. नागरिकांनी नगरसेवक विजय चुटेले व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांना घटनास्थळी बोलावले. नगरसेवकांनी पथकातील अधिकाºयांकडे उच्च न्यायालयात २ आॅगस्टची सुनावणी होईपर्यंत कारवाई थांबविण्याची मागणी केली. यानंतर महापालिकेचे अधिकारी १० आॅगस्टपर्यंतची मुदत देऊन निघून गेले. संबंधित धार्मिक स्थळ अतिक्रमित जागेवर नाही. रस्त्याच्या मध्येही. त्यामुळे ते तोडणे योग्य नाही, असे नगरसेवक चुटेले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर