लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कर्मचारीसंपादरम्यान बँक व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात नारेनिदर्शने करणार आहेत, शिवाय बँकेसमोर मंडपात उषोषणावर बसणार आहेत.संपात बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७२ शाखांचे व्यवस्थापक, रोखपाल व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे ७२ शाखांचे व्यवस्थापक आणि रोखपाल सायंकाळी ६ वाजता शाखा आणि तिजोरीच्या चाव्या देण्यासाठी प्रशासन अधिकारी देवेंद्र वानखेडे यांच्याकडे आले होते. पण त्यांनी चाव्या घेण्यास नकार दिला. त्यामुळे बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विजय शहाणे आणि सचिव चंद्रकांत रोठे यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजल कोरडे यांच्याशी चर्चा केली. कोरडे यांनी वानखेडे यांना शाखांच्या चाव्या स्वीकारण्याचे निर्देश दिले. सायंकाळी ७ नंतर सुरू झालेली चाव्या स्वीकारण्याची प्रक्रिया रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती.शहाणे यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांची एप्रिल २०१४ पासून नियमित सुरू असलेली वार्षिक पगारवाढ आणि मे २०१५ पासून महागाई भत्ता रोखण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेचे प्राधिकृत मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल हे कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यात सकारात्मक होते. पण प्राधिकृत मंडळाच्या अध्यक्षपदी आता सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा रखडला आहे. तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला यांनीही कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ आणि महागाई भत्ता रोखता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँक नफ्यात असतानाही व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
नागपूर जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांमध्ये तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:37 PM
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, ५ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कर्मचारी संपादरम्यान बँक व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात नारेनिदर्शने करणार आहेत, शिवाय बँकेसमोर मंडपात उषोषणावर बसणार आहेत.
ठळक मुद्देशाखांच्या चाव्या स्वीकारण्यास नकार : कर्मचारी ५ पासून बेमुदत संपावर