लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला.अत्यंत वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या गांधीबागेतील नंगा पुतळा, तीन नळ चौकाजवळ एक धार्मिक स्थळ आहे. या स्थळावरून दोन गटात परस्पर विरोधी सूर असल्याने तेथे नेहमी धुसफूस सुरू असते. आज दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान या स्थळावर टिनशेड उभारण्यासाठी तेथील एकाने आक्रमक भूमिका घेतली. त्याने आणलेल्या १५ ते २० तरुणांनी तेथे टिनचे शेड बनविण्याचे प्रयत्न केले. त्याला काही व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यावरून जोरदार वाद झाल्यानंतर टिनशेड उभारू पाहणाऱ्या तरुणांपैकी काहींनी व्यापाऱ्यांवर हल्ला चढवला. विरोधी गटाकडूनही त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेत एकच गोंधळ निर्माण झाला. हल्ल्याच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या व्यापाºयांनी घोषणाबाजी करून आजूबाजूची दुकाने बंद केल्याने तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत व्यापारी आणि शेड उभारणारे तहसील ठाण्यात पोहचले. त्यांनी एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली. ही वार्ता सर्वत्र पोहचल्याने त्या भागातील काही स्थानिक नेतेमंडळीही पोहचली. ठाणेदार वैभव जाधव यांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना कारवाई आणि परिणामाची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात उभारलेले टिनाचे शेड काढून टाकण्यात आले. तब्बल अडीच ते तीन तास पोलिसांनी तेथील परिस्थिती हाताळल्यानंतर वातावरण शांत झाले.तक्रार देण्यास टाळाटाळएकमेकांवर मोठ्या जोरात आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या दोन्ही गटातील मंडळींनी पोलिसांकडे तक्रार देण्याचे मात्र टाळले. मात्र, तहसील पोलिसांनी स्वत:च फिर्यादी बनून टिनशेड उभारून वाद निर्माण करणाऱ्या
धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून नागपुरातील गांधीबागमध्ये तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:41 PM
इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला.
ठळक मुद्देदोन गट आमने-सामने : पोलिसांनी कौशल्याने प्रकरण हाताळले