शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

दहशतवाद जिहादी असू शकत नाही

By admin | Published: December 27, 2015 3:16 AM

जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत.

तारिक अन्वर यांचे ठाम मत : ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ चर्चासत्रनागपूर : जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. धर्म संकटात असल्याचे सांगून दहशतवादी लोकांना संघटित करीत आहेत. दहशतवाद जिहादी असूच शकत नाही, असे ठाम मत आॅल इंडिया कौमी तंझिमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तारिक अन्वर यांनी येथे व्यक्त केले. आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरुद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर मुख्य अतिथी म्हणून लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे राज्य सचिव अजय पाटील, आसरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अजिज सोळंकी, चार्टर्ड अकाऊटंट डॉ. तेजिंदरसिंग रावल, आॅल इंडिया कौमी तंझिमचे महाराष्ट्रचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे आणि शब्बीर विद्रोही उपस्थित होते. तारिक अन्वर म्हणाले, देशात सत्तारूढ सरकारचे सूत्रधार नागपुरात असल्यामुळे या चर्चासत्राचा प्रारंभ नागपुरात केला. पुढे देशातील सर्व राज्यात चर्चासत्र घेण्यात येणार आहे. व्यक्तीच्या भावना धर्माशी जुळल्या असल्यामुळे त्याला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी धर्म हा सोपा मार्ग समजला जात आहे. हे चुकीचे आहे. यासाठी एकाने दुसऱ्या धर्माला समजून घेण्याची गरज आहे. खा. विजय दर्डा म्हणाले, योग्यतेपुढे धर्म येऊ नये. धर्माच्या नावावर लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘आर्म्स फॉर पीस’च्या गोष्टी करणारे व्यवसाय करीत आहेत. आम्हाला काय करायचे आहे, हे प्रारंभी निश्चित करावे. यावेळी दर्डा यांनी महिला शिक्षणावर भर दिला. शिक्षण व्यक्ती बदलू शकते. विकास व रचनात्मकतेचे उदाहरण देताना त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला. अखंडता कायम राखामुनाफ हकीम म्हणाले, एका-एका शब्दाबाबत भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशाचे तुकडे करणाऱ्यांपासून सावध राहावे आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.दुफळी निर्माण करतो दहशतवाद इस्लामचे जाणकार मौलाना मुस्तफा रजा म्हणाले, गैरसमज शत्रुत्व निर्माण करते, तर शत्रुत्व दहशतवाद. अधिकाराचे रक्षण, अन्याय आणि दहशतवाद नष्ट करण्याचे काम जिहाद करते. जगातील अनेक संघटना मानवतेच्या शत्रू आहेत आणि जिहाद शब्दाचा चुकीचा अर्थ काढत आहे.ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे म्हणाले, हुसेन यांनी जे केले तो जिहाद होता. धर्मावर बोलणाऱ्या अनेकांना धर्माची फार कमी माहिती असते. दुसऱ्या धर्माची माहिती असायला हवी. डॉ. तेजिंदरसिंग रावल म्हणाले, शिखांनासुद्धा अशाच त्रास झाला होता. दहशतवादाला मुस्लीम सर्वाधिक बळी पडले आहेत. समाजात भीती निर्माण करणाऱ्यांचा धर्म केवळ दहशतवाद आहे. वरिष्ठ नेते शब्बीर विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्यांपूर्वी इंग्रज क्रांतिकारकांना दहशतवादी समजायचे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच क्रांतिकारांना देशभक्त समजले गेले. पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ) यांनी सांगितले आहे की, देशाप्रति प्रेम असणे, ही देशभक्ती आहे. आपल्यातील स्वार्थ आणि वाईट भावना दूर करण्याची लढाई म्हणजेच जिहाद आहे. संजय कोहचाडे म्हणाले, दहशतवादाच्या विरोधात प्रेमाचे हत्यार यशस्वी ठरले आहे. जगात दहशतवाद पसरविला जात आहे. तो जिहाद नाही. येशू मसिहाच्या संदेशाचे पालन केले तर हा विषयच राहणार नाही. यावेळी अनिल देशमुख आणि अजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. संचालन मो. आसीम अली यांनी केले. यावेळी ‘एआयक्यूटी’ विदर्भ सचिव मो. फझल पटेल, अमरावतीचे अब्दुल रफीक, वरोराचे शेख झहीरुद्दीन, यवतमाळचे मिर्झा वसीम बेग, अकोलाचे शेख वसीम, वर्धाचे इरफान बेग, नागपूरचे सलीम खान आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)आॅल इंडिया कौमी तंझिम (एआयक्यूटी) या संघटनेच्या विदर्भ विभागातर्फे ‘जिहाद विरूद्ध दहशतवाद’ या विषयावर सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे शनिवारी आयोजित चर्चासत्रात मौलाना मुस्तफा रजा यांच्या ‘आतंकवादी संघठन इस्लाम की कसोटीपर’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ‘एआयक्यूटी’चे अध्यक्ष खासदार तारिक अन्वर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे, अनिल देशमुख, अजय पाटील, डॉ. अजिज सोळंकी, सीए डॉ. तेजिंदरसिंग रावल, मुनाफ हकीम, फादर संजय कोहचाडे, शब्बीर विद्रोही, मो. आसीम अली उपस्थित होते.