शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळाले नाहीहे कसले मिशन ‘आॅनलाईन’ ?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. वेळेत परीक्षा प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’च न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताच आले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यासंदर्भात विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाकडून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. परंतु या सर्वात विद्यार्थ्यांना नाहक मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने ‘आॅनलाईन’ परीक्षा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रदेखील ‘आॅनलाईन’च पुरविण्यात आले. ही प्रवेशपत्रे महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’मध्ये पुरविण्यात आली. विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यात पदव्युतर अभ्यासक्रमातील परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारपासून या परीक्षांना सुरुवात झाली. मात्र गेल्या पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्रासाठी रांगा लागल्या होत्या. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशपत्रे ‘डाऊनलोड’च झाली नाहीत. पेपरचा वेळ सकाळी ९.३० चा असताना काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे चक्क ११.३० वाजता ‘डाऊनलोड’ झाली. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.जबाबदार कोण?नागपूर : ‘आॅनलाईन’ प्रणालीबाबत अनेक महाविद्यालयांमध्ये सुरुवातीपासून संभ्रमाचे वातावरण होते. विद्यापीठाने ‘एमकेसीएल’च्या मदतीने महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणदेखील दिले. परंतु तरीदेखील अखेरच्या क्षणापर्यंत काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ झालेच नाही. आम्ही महाविद्यालयांना प्रवेशपत्रांसंबंधात अगोदरच सूचना दिली होती. तरीदेखील त्यांनी तत्परतेने प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ केली नाहीत. ऐनवेळी तारांबळ उडाल्यावर तांत्रिक कारण समोर केले, असे परीक्षा भवनातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. तर विद्यापीठाने पाठविलेल्या प्रवेशपत्रांमध्ये काही विद्यार्थ्यांची माहितीच नव्हती. शिवाय ‘सर्व्हर’ अतिशय संथ होते. ‘मॅन्युअल’ प्रवेशपत्र देण्यास नकार देण्यात आला, असा आरोप एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी लावला आहे. (प्रतिनिधी)
परीक्षेला फटका
By admin | Published: November 01, 2015 3:04 AM